Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

संजय पाटील, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 6:09 PM

ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. पंतला या अपघातात मार लागला. पंतवर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे पंत क्रिकेटपासून 6 महिन्यांसाठी बाहेर झाल्याचं म्हटलं जात आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रुग्णालयात सध्या उपचार घेतोय. पंतचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. या अपघातात पंतला मार लागला. तेव्हापासून पंतवर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे पंत टीममधून जवळपास 6 महिन्यांसाठी बाहेर झाल्याचं म्हटलं जात आहे. पंतला पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो. एकाबाजूला पंत झगडतोय. तर दुसऱ्या बाजूला त्याला आणि त्याच्या चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज मिळाली आहे.

आयसीसीने 2022 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली आहे. या सर्वोत्तम कसोटी संघात पंतने स्थान पटकावलंय. विशेष म्हणजे पंत या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.

आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली. या प्लेइंग इलेव्हनचं कर्णधारपद इंग्लंडच्या बेन स्टोक्सकडे देण्यात आलं आहे. पंतने 2022 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. पंतने 12 डावांमध्ये 61.68 च्या सरासरीने आणि 90.90 स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच पंतने 21 षटकारही ठोकले. तर स्टंपमागे म्हणजेच विकेटकीपिंग करताना त्याने 23 कॅच घेतल्या आणि 6 फलंदाजांना स्टंपिंग केलं.

टीम इंडिया व्यतिरिक्त पाकिस्तान टीममधूनही बाबर आझम या एकमेव खेळाडूची निवड करण्यात आली आहे. कर्णधार बाबरने 2022 मध्ये 69.94 च्या सरासरीने 1 हजार 184 धावा केल्या. यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे.

पंतला पुन्हा ब्लू जर्सीत मैदानात खेळताना प्रत्येक भारतीय चाहत्याला पाहायचंय. पंतचा 30 डिसेंबरला घरी जाताना हायवेवर कारचा अपघात झाला. या अपघातातून पंत वाचला. अपघातानंतर पंत गाडीतून बाहेर निघाला त्यामुळे पुढचा अनर्थ टळला, कारण त्यानंतर गाडीने पेट घेतला होता. दरम्यान पंतच्या तब्येतीत आता सुधारणा होतेय. पंतने स्वत: अपघातानंतर ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

आयसीसी टेस्ट बेस्ट टीम 2022 : उस्मान ख्वाजा, क्रेग ब्रेथवेट, मार्नस लाबुशेन, बाबर आजम, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, नॅथन लायन आणि जेम्स एंडरसन.

दरम्यान आयसीसीने सोमवारी 23 जानेवारीला 2022 वर्षातील सर्वोत्तम टी 20 टीमही जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या तिघांचा या बेस्ट टी 20 टीममध्ये समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

आयसीसी टी 20 सर्वोत्तम टीम

जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिजवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सैम कुर्रन, वानिंदु हसरंगा, हारिस रऊफ आणि जोश लिटिल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI