Oscar 2023 कडे संपूर्ण जगाचं लक्ष; कधी होणार नॉमिनेशनची घोषणा ?

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 8:04 AM

सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. आता संपूर्ण जगाचं लक्ष Oscar 2023 लागलं आहे. कधी होणार Oscar 2023 नॉमिनेशनची घोषणा ?

Oscar 2023 कडे संपूर्ण जगाचं लक्ष; कधी होणार नॉमिनेशनची घोषणा ?
Oscar 2023 कडे संपूर्ण जगाचं लक्ष; कधी होणार नॉमिनेशनची घोषणा ?

95th Oscar : सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. आता संपूर्ण जगाचं लक्ष Oscar 2023 कडे लागलं आहे. अमेरिकेतील लॉज एन्जिल्समध्ये होणाऱ्या ९५ अकादमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारतासह संपूर्ण जगातील कलाकार उत्सुक असतात. कारण या पुरस्कार सोहळ्या कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. यंदाच्यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतातील ११ सिनेमे सामिल झाले आहेत. ज्यामधील ४ शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा आज म्हणजे २४ जानेवारी रोजी बेवर्ली हिल्स, कॅलिफोर्निया येथून लाईव्ह होणार आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा आज होणार असल्यामुळे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सिनेमा असे मानाचे पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ९५ व्या ऑस्कर पुरस्कार नॉमिनेशनची घोषणा रिझ अहमद आणि एलिसन विलियम्स करणार आहेत.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास असणार आहे. यावर्षी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे.. याशिवाय छेलो शो, ऑल दॅट ब्रीथ्स आणि द एलिफंट व्हिस्पर्स हे सिनेमे ऑस्करच्या शर्यतीत आहेत. ऑस्कर नॉमिनेशनसाठी भारतीय सिनेमांची निवड होणार की नाही हे आज कळणार आहे.

रिपोर्टनुसार, ९५ व्या ऑस्कर पुरस्कार नॉमिनेशनची घोषणा २४ जानेवारी रोजी होणार आहे. १२ मार्च रोजी ९५ ऑस्कर सोहळ्याचं लाइव टेलीकास्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे कलाकारांसह सर्वांचं लक्ष ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं आहे.

ऑस्कार पुरस्कार सोहळ्याचं हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमधून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. एबीसीवर आणि जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये थेट प्रसारित केले जाईल. शिवाय तुम्ही oscars.com, oscars.org किंवा अकादमीच्या YouTube, Facebook, Instagram, TikTok, Twitter वर थेट पाहू शकता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI