भयानक, कुत्र्याला कुत्रा म्हटलं म्हणून एकाला जीवानिशी संपवलं

काहीवेळा छोट्या-छोट्या भांडणांच मोठ्या वादात रुपांतर होतं. कधी कधी वाद इतका विकोपाला जातो की, त्यातून एखाद्या व्यक्तीला आपल्या प्राणांना मुकाव लागतं. त्याने अनेकदा शेजाऱ्यांकडे त्या कुत्र्याची तक्रारही केली होती.

भयानक, कुत्र्याला कुत्रा म्हटलं म्हणून एकाला जीवानिशी संपवलं
Dog AttackImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 11:38 AM

चेन्नई – काहीवेळा छोट्या-छोट्या भांडणांच मोठ्या वादात रुपांतर होतं. कधी कधी वाद इतका विकोपाला जातो की, त्यातून एखाद्या व्यक्तीला आपल्या प्राणांना मुकाव लागतं. तामिळनाडूमध्ये अशाच प्राण्यावरुन झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या झाली. शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला कुत्रा म्हटलं म्हणून ही हत्या झाली. यात एका 65 वर्षीय शेतकऱ्याची हत्या झाली. तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील थाडीकोंबू शहरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने आसपासच्या सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

भांडणाची सुरुवात कशावरुन झाली?

रायाप्प्पन शेजाऱ्यांनी घरात पाळलेल्या कुत्र्यावर नाराज होता. त्याने अनेकदा शेजाऱ्यांकडे त्या कुत्र्याची तक्रारही केली होती. शेजारी रहाणारे डॅनियल आणि विनसेंट हे रायाप्पनचे नातेवाईक होते. घराजवळून जाणाऱ्या वाटसरुंवर कुत्रा भुंकायचा. त्यांच्या अंगावर धावून जायचा. त्यावरुन रायाप्पनच्या मनात राग होता. रायाप्प्नने त्या कुत्र्यांना त्यांच्या नावावरुन बोलवलं नाही. त्यांना कुत्रा म्हटलं. त्यावरुन भांडणाची सुरुवात झाली. या कुत्र्याला मालकाने चैन बांधून ठेवाव, असं त्याच म्हणणं होतं. मारण्यासाठी काठी घेऊन आला

हे सुद्धा वाचा

गुरुवारी वाद नियंत्रणाबाहेर गेला. भांडण सुरु असताना रायाप्पन त्या कुत्र्याला मारण्यासाठी काठी घेऊन आला. संतापलेल्या विनसेंट आणि डॅनियलने हल्ला चढवला. रायाप्पन खाली पडला, तो बेशुद्ध झाला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. थाडीकोंबू पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींच्या शोधासाठी लूकआऊट नोटीस जारी केलीय.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.