पाकिस्तानच्या ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कोचच्या मुलीसोबत ‘निकाह’

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या विवाहसोहळे सुरु आहेत. एकाच महिन्यात पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंनी लग्न केलय. कोचच्या मुलीसोबत त्याने निकाह केला. सध्या सकलेन मुश्ताक पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच आहेत.

पाकिस्तानच्या 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कोचच्या मुलीसोबत 'निकाह'
Image Credit source: google
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 9:58 AM

लाहोर – पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या विवाहसोहळे सुरु आहेत. एकाच महिन्यात पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंनी लग्न केलय. यात आता शादाब खान हे ताजं नाव आहे. हा सिलसिला इथेच थांबणार नाहीय. कारण यापुढे आणखी काही खेळाडू विवाहबद्ध होणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खानने लग्न केलय. कोचच्या मुलीसोबत त्याने निकाह केला. सध्या सकलेन मुश्ताक पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच आहेत.

लग्नाबद्दल कधी समजलं?

शादाब खान सकलेन मुश्ताकला आपला मार्गदर्शक मानतो. आता दोघांमध्ये फक्त खेळाडू आणि कोचच नात राहिलेलं नाही. त्यापुढे जाऊन दोघांमध्ये सासरे आणि जावयाच नातं निर्माण झालय. गुप्तपणे शादाबने सकलेनच्या मुलीसोबत निकाह केला. शादाबने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या लग्नाबद्दल समजलं.

एकाच दिवसात दोन प्रसिद्ध क्रिकेटपटू विवाहबद्ध

भारतात केएल राहुलच लग्न झालं, त्याचवेळी पाकिस्तानात शादाब खानचा निकाह झाला. शादाब खान पाकिस्तानी टीमचा उपकर्णधार आहे. 23 जानेवारी हा दिवस दोघांसाठी खास आहे. अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीसोबत राहुलने तर शादाब खानने सकलेन मुश्ताकच्या मुलीसोबत निकाह केला.

सोशल मीडियावर दिली लग्नाची माहिती

शादाब खानने सोशल मीडियावरुन आपल्या लग्नाची अपडेट दिली. का गुप्तपणे लग्न केलं? त्याची माहिती दिली. शादाबच्या लग्नाबद्दल समजल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या सदस्यांनी सुद्धा शादाबला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये लग्नाचा सीजन

एका महिन्यात आत निकाह करणारा शादाब खान तिसरा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात हॅरिस रौफने सुद्धा निकाह केला. 20 जानेवारीला शान मसूदने लग्न केलं. आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये शाहीन शाह आफ्रिदी सुद्धा विवाहबद्ध होईल. म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचा सीजन आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.