ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या, अमित ठाकरे मैदानात

विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रुपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. (amit thackeray postpone mpsc exam state government)

ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या, अमित ठाकरे मैदानात
अमित ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 7:02 PM

मुंबई : राज्य सरकारने येत्या 14 मार्चला होऊ घातलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्य सरकारला असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. सरकारविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलनं केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीसुद्धा सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. परीक्षा दोन दिवसांवर असताना सरकार परीक्षा पुढे ढकलू शकत नाही, असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटलंय. तसेच, राज्यात विद्यार्थी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रुपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही त्यांनी केला. फेसबुक पोस्टद्वारे तसेच ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Amit Thackeray opposes the decision of postponement of mpsc exam date criticizes state government)

…तर जबाबदारी कोण घेणार

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 14 मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुले प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी ते रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?,” असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय.

परीक्षा ठरवलेल्या दिवशीच व्हावी

तसेच अमित ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवत एमपीएससीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेनुसारच व्हाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. तशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे. “बिचारे विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. परीक्षा पुढे ढकलणे बरोबर नाही. सगळेच विद्यार्थी एकाच प्रयत्नात परीक्षा पास होतात असे नाही. अनेक विद्यार्थ्यांचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न असतो. ते एज बार होऊ शकतात. 14 तारखेच्या परीक्षा घ्यायलाच पाहिजेत. परीक्षा 3 दिवसांवर असताना सरकार अचानक असे निर्णय घेऊ शकत नाही,” असे अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलल्यानंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारला कडाडून विरोध केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. त्यानंतर वाढता विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य तो निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी मतद आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. ठाकरे योग्य तो निर्णय घेणार आहेत अशी माहिती देण्यात आलीये.

इतर बातम्या :

MPSC Preliminary Exam | MPSC परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

महिला चहा करण्यासाठी गॅस जवळ गेली, पाईप लीक झाल्याने अग्नितांडव, अख्खा संसार जळून खाक

(Amit Thackeray opposes the decision of postponement of mpsc exam date criticizes state government)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.