
राज्यात 29 महापालिकांचा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी युती, आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा मनसुबा अनेक पक्षांचा आहे. मात्र याच दरम्यान एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायलं मिळत आहे. नुकताच पुण्यात दोन्ही राष्ट्रीवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे एकत्र दिसले. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुणेकर आणि पिपंरी – चिंचवडकरांच्या हितासाठी घेतला… असं अमोल कोल्हे म्हणाले.
‘दोन राष्ट्रवादी मानाने एकत्र आल्या नसत्या तर, तुम्हाला स्टेजवर एकत्र दिसल्या नसत्या. एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध झाला नसता. आदरनीय ताई आणि दादा एकत्र स्टेजवर दिसले नसते. एवढंच नाही तर, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र फोटोवर देखील कोल्हे यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘पवार साहेब आणि दादांचा फोटो एकत्र पाहिल्यानंतर पुणेकर आणि पिंपरी – चिंचवडकरांच्या हितासाठी जो काही निर्णय घेतलेला आहे तो दोन राष्ट्रवादींनी एकत्र येवून घेतलेला निर्णय आहे…’
भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र राहतील का? यावर देखील अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केलं आहे. ‘अजून तरी मी अभिनय करत आहे. थोडंफार राजकारण करत आहे. अद्याप मी भविष्यवेत्ता झालेलो नाही…’ असं अमोल कोल्हे म्हणाले.
दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना देखील विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो अर्थ घ्या… तर अजित पवार ‘थांबा आणि पाहा..’ असं म्हणाले. एवढंच नाहीतर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अजीत पवार यांच्यासोबत असलेले कौटुंबित संबंध चांगले आहेत. पण आमच्याच काही राजकीय मतभेद होते आणि आहेत…’