AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा… ; अजितदादा यांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार

बेसिक मुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार सुरू आहे. शिवाजीराव आढळराव पाटील तेच करत आहेत, अशी टीका शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गेट वेल सून म्हणत आढळराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. ते निवडणूक प्रचाराच्या रॅलीत बोलत होते.

खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा... ; अजितदादा यांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार
| Updated on: Apr 15, 2024 | 2:08 PM
Share

तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अमोल कोल्हे हे राजीनामा द्यायला निघाले होते. त्यांना मीच थांबवलं होतं, असा दावाही अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. ज्याला नटसम्राट म्हणवता, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला..! मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटीसम्राट, खोकेसम्राट असलेलं चांगलं, असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.

अमोल कोल्हे गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला. अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढचं म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वाने केलं. माझे काका नटसम्राट नव्हते. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

महायुतीत धुसफूस

यावेळी अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या जागा वाटपावरही चिमटा काढला. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात. उत्तर भारतात हीच परिस्थिती आहे. काही उमेदवार तर भाजपचे तिकीट परत करत आहेत. महायुती अजूनही बॅकफूटवर आहे. महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.

मेरे पास…

मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है… तुम्हारे पास क्या है… हा जुना संवाद. आताच्या काळात असं म्हणतात, मेरे पास नेता है, मेरे पास पैसा है, सत्ता है, तुम्हारे पास क्या है? तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मेरे पास शिरुर मतदारसंघातली मायबाप जनता आहे, असंही ते म्हणाले.

राजकारणातील स्तर घसरू नये

प्रचारात जेष्ठ नागरिकांकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका होत असताना कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हातातला माईक काढून घेतल्याचा प्रकार इंद्रायणीनगर भोसरीमध्ये घडला. दिलीप वळसे पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या राजकारणाच्या रिंगणात ओढणं चुकीचं असल्याचं सांगत राजकारणातील सुसंस्कृतता प्रत्येकाने जपली पाहिजे हीच यामागील भावना होती, असं कोल्हे म्हणाले. निवडणूक येते, जाते, पद येतात, जातात पण राजकारणाचा स्तर घसरू नये ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.