दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर भुजबळांना मिळणार होती ही जबाबदारी, अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावर बोलताना आता अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर भुजबळांना मिळणार होती ही जबाबदारी, अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 6:45 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावर दावे, प्रतिदावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच विलिनीकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होणार होते, तशी अजितदादांची इच्छा होती,  असं रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर आता अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासंदर्भात देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे? 

विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. या आधी छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते, त्यावेळेला सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या, मात्र विलिनीकरणानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मला वाटतं की छगन भुजबळ हे खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, विशिष्ट जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेंबासारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती. त्यावेळी दादांनी ओघाने सांगितलं होतं की कदाचित भुजबळसाहेब हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती. आता मात्र सामाजिक प्रश्नांची इतकी जाण असणारा नेता राज्यसभेवर न जाता, कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होत असेल, त्यामुळे कदाचित भुजबळ अस्वस्थ असतील, त्याबाबत मला कल्पना नाही.