पोलिसाने केली कमाल, 22 मिनिटांत पाण्यावर केले 50 योगासन, विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
yogasan : जगभरात योगासनांचे महत्व वाढत आहे. यामुळे २१ जून हा दिवस जगभर जागितक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या योगासनांची नोंद झाली आहे.

स्वप्नील उमप, अमरावती : योगासने तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे योगसनांचे महत्व देशात नाही तर जगभरात वाढत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आता दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली होती. योगासनेचे हे महत्व लक्षात घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्याने पाण्यावर योगासने करण्याचा जागतिक विक्रम केला.
22 मिनिटांत 50 योगासन
तासाभरात पाण्यात 25 योगासन करण्याचा टार्गेट असताना अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण दादाराव आखरे यांनी 22 मिनिट 52 सेकंदात पाण्यात 50 योगासन करून नवा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तासाभरात सर्वाधिक 50 योगासनाची नोंद आज या निमित्ताने अमरावती येथे झाली आहे.
योगासनांचा विक्रम, २२ मिनिटांत पाण्यात केली ५० योगासने pic.twitter.com/R8S8xI1BA1
— jitendra (@jitendrazavar) May 28, 2023
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालय येथील जलतरण केंद्रात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रवीण आखरे हे जलतरण तलावात उतरले आणि त्यांनी अवघ्या बारा मिनिट 47 सेकंदात 50 योगासन करण्याचे लक्ष पूर्ण केले. यानंतर पुढे 22 मिनिट 52 सेकंदात त्यांनी 50 योगासन करून विक्रम नोंदवला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली, असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर मनोज तत्ववादी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस आयुक्तांनी केला सत्कार
अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण आखरे यांनी पाण्यावर तासाभरात 50 योगासन करण्याचा नवा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविला असताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि सागर पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
योगासनाचे काय फायदे
- योग केल्याने शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- योगासनामुळे ताण कमी होते, तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो.
- योगासनांमुळे तुमच्या स्नायूंना बळ मिळते.
- नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते.
- योगामुळे तणाव दूर होतो. चांगली अन् शांत झोप लागते.
- योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. पोटाचे विकार दूर होतात
