Amravati: झेंडा लावण्यावरुन वाद! अचलपूरमध्ये झालेल्या राडाप्रकरणी 16 जणांना अटक, 35 जणांवर गुन्हा

| Updated on: Apr 18, 2022 | 9:33 AM

हाणामारीप्रकरणी सकाळी 9 वाजेपर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 35 जणांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

Amravati: झेंडा लावण्यावरुन वाद! अचलपूरमध्ये झालेल्या राडाप्रकरणी 16 जणांना अटक, 35 जणांवर गुन्हा
अचलपुरात तगडा पोलीस बंदोबस्त
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती: अमरावतीच्या अचलपूरमध्ये (Achalpur, Amravati) झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आहे. अचलपुरात झेंडा लावण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली होती. दरम्यान, या हाणामारीप्रकरणी सकाळी 9 वाजेपर्यंत 16 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर 35 जणांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. अचलपूर आणि परतवाडा शहरात या राड्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अचलपुरातील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सध्या अचलपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता या भागात पाहायला मिळली. अचलपूर आणि परतवाडा (Paratwada) शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं अचलपूरमध्ये?

अचलपूरमध्ये नेमकी घटना केव्हा घडली, काय घडली? हे समजून घेऊयात 9 सोप्या मुद्द्यांमधून..

  1. अचलपूरच्या दुल्हा गेटवर राडा झाला
  2. झेंडा काढल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला
  3. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली
  4. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटवण्यात आला
  5. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राडा झाल्याची माहिती
  6. राडा निवळल्यानंतर पोलिसांकडून खबरदारीची पावलं
  7. पोलिसांकडून अचलपूर आणि परतवाडात संचारबंदी लागू
  8. सध्या अचलपुरात संचारंबदी सदृश्य स्थिती आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
  9. आवश्यकता नसल्यान घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन

पाहा अमरावतीत आता नेमकी काय परिस्थिती?

अमरावतीमधून प्रतिनिधी स्वप्नील उमप यांचा थेट आढावा – पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईफेक प्रकरण; राणा दाम्पत्य पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी जाणार

राज ठाकरे दंगली भडकवण्याचे काम करतात, आमदार अमोल मिटकरी यांची टीका

राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची जागा घेणार, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं मोठं विधान