CJI Bhushan Gavai : ‘खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही’; सरन्यायाधीशांच्या त्या वक्तव्याची एकच चर्चा, कुणाला लगावला टोला?
CJI Bhushan Gavai : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 'खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही', असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांच्या वक्तव्याचे अनेकांनी स्वागत केले आहे. काय म्हणाले सरन्यायाधीश?

‘खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही’, असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. त्याची देशभरात एकच चर्चा सुरू आहे. त्यांचा हा टोला नेमका कुणाला होता, याची खरपूस चर्चा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्धघाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. त्याचवेळी विविध विषयावर सडेतोड विचार मांडले. काय म्हणाले सरन्यायाधीश?
दर्यापूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारत उद्धघाटन प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. अत्यंत सुंदर अशी दर्यापूर न्यायालयाची इमारत आहे. मी सर्वचे अभिनंदन करतो. दर्यापूरला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व्हावे यासाठी मी प्रयत्न केले पण सरकारच्या रेट कमुनिकेशनचा व्हायरस आमच्या विभागावर पडतो त्याचा परिणाम होतो. मी आज सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून नाही तर दर्यापूरचा एक रहिवाशी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. लोकांवर टीका करणं, चुका काढणं मला योग्य वाटत नाही. महाराष्ट्र हा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मागे आहे अस बोललं जातं होत. पण मी देशभर फिरतो पण महाराष्ट्र मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उच्च दर्जाचे आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस हे न्याय विभागाला इमारती देण्यासाठी समोर आले आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
न्यायाधीशांचे टोचले कान
खुर्ची डोक्यात जाण्या एवढं कुठलंच पाप नसते. काहीजण न्यायाधीश झाले की त्यांच्या डोक्यात खुर्ची जाते, असे कान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी टोचले. वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे. न्यायाधीशांना सांगतो की डोक्यात खुर्ची जाऊ देऊ नका, असे सरन्यायाधीश म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना, एसपी यांना सांगतो ही खुर्ची आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे, असे ते म्हणाले.
कनिष्ठ वकिलांना वडीलकीचा सल्ला
आज-काल परिस्थिती अशी आहे की एखादा 25 – 26 वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असतो आणि 70 वर्षाचा सीनियर वकील जरी आला तर त्याला खुर्ची देत नाही. कधी कधी मला म्हणावं लागते ती थोडा तरी सीनियर वकिलांचा सन्मान ठेवा ज्युनिअर वकिलांना भूषण गवई यांनी असा सल्ला दिला.
जे जजेस झाले, त्यांच्या डोक्यात लगेच खुर्ची जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखा दुसरं काहीही पाप नाही,यानंतर न्यायाधीशाच्या खुर्च्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सारखे असावे भूषण गवळी यांनी असा सल्ला दिला. न्यायाधीशांनी देखील वकिलांना सन्मानाची वागणूक द्यावी न्यायाधीशांनी देखील खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नये, खुर्ची कोणतीही असो ती या देशातील नागरिकांची सेवा करण्यासाठी मिळालेली खुर्ची आहे, या खुर्चीचा आपण योग्य सन्मान राखावा. असे सरन्यायाधीश म्हणाले.
या देशांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आणायचे असेल तर नुसतं राजकीय लोकशाही आणून चालणार नाही तर, आपला समाज हा चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेलेला आहे. आपण बघतो की बाबासाहेबांनी, आज आपल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे या 75 वर्षाच्या कालखंडात या देशाची पार्लमेंट असो एक्झिक्युटिव असो त्या देशाची न्यायपालिका असो यांनी आपल्या घटनेला चे सामाजिक आणि समतेचा ध्येय गाठलेला आहे ते निश्चित अशी वाटचाल केलेली आहे आणि कसे कायदे आले ज्या कायद्यामुळे अनेक शासकीय जमिनी सामान्य माणसाला देण्यात आले, महिलांच्या हिताचे सबलीकरणाचे अनेक फायदे आणले गेले.
75 वर्षाच्या कालखंडात देशाने खऱ्या अर्थाने प्रगती केलेली हे आपला देश प्रगतीपथावर आहे परंतु या देशात खऱ्या अर्थाने आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची असेल तर राज्यघटने प्रति पूर्ण निष्ठा ठेवून राज्यघटनेमध्ये जे अधिकार आहेत त्यांचा समेट घालून या देशातील शेवटच्या नागरिकाला त्याला जलद गतीने कसे मुख्य प्रवाहात सामील करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत सरन्यायाधीशांनी मांडले.
