नारायण राणे विसरू नका तु्म्ही शिवसेनेचं प्रोडक्ट आहात, दादा भुसेंचा खोचक टोला

आता कृषिमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी राणेंना टोला लगावला आहे. नारायण राणे हे शिवसेनेचंच प्रोडक्ट आहे, हे त्यांनी विसरायला नको, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

नारायण राणे विसरू नका तु्म्ही शिवसेनेचं प्रोडक्ट आहात, दादा भुसेंचा खोचक टोला
राज्य कृषिमंत्री दादा भुसे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:24 PM

स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून राजकारणाचा पारा चढला आहे. त्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या यांनी तर माहोल आणखीच तापवला आहे. अशात केंद्रीय मंत्री नारायण राणेंही शिवसेनेवर आणि राऊतांवर अनेक आरोप करत आहेत. शिवसेनेकडूनही राणेंना (Narayan Rane) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता कृषिमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी राणेंना टोला लगावला आहे. नारायण राणे हे शिवसेनेचंच प्रोडक्ट आहे, हे त्यांनी विसरायला नको, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. तर काही गोष्टीचे काळ वेळ उत्तरं असते. काही पोपट बोलतात ,काही जण बेछूट आरोप करतात. काही लोक पहाटेचा शपथविधी विसरले नाही. असे म्हणत त्यांनी राणेंवर पलटावर केला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातला वाद काही केल्या शांत व्हायचं नाव घेईनाय.

कोरोनाकाळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे कौतुक

तसेच गोड बातमी लवकरच आपल्याला कळेल, असे सूचक विधानाही त्यांनी संजय राठोड यांच्या बाबतीत केलं आहे. त्यामुळे संजय राठोड पुन्हा हे चर्चेत येण्याची शक्यता आहे. कधी कधी मुख्यमंत्री काहीच बोलायचे नाही, पण चांगले कार्य त्यांनी केले. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे न्यायालयाने कौतुक केलं आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राने ज्या पद्धतीने लढा दिला. जशी परिस्थिती हातळली त्याचे कौतुक होत आहे.

शेतकऱ्यांना लवकरच गोड बातमी

तसेच शेतकऱ्यांबाबत बोलताना, संत्रा जास्त दिवस कसा टिकू शकेल. त्याचे ज्यूस जास्त दिवस कसे टिकेल यावर संशोधन सुरू आहे. शालेय अभ्यासक्रमात कृषी अभ्यास देण्याचा आमचा मानस आहे. प्रधानमंत्री पीक विम्याचे कार्यालय प्रत्येक तालुक्यात असले पाहिजे. 100 पैकी 42 शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला. शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात, त्यामुळे ते विम्यापासून वंचित राहतात, असेही ते म्हणाले. तसेच सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव आले पाहीजे. संत्राला मानांकन प्राप्त करून देऊ. त्यासाठी ग्रामविकास समिती स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. विकेल ते पिकेल योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांनीही चांगल्या दर्जाचा शेतमाल पिकवावा. सेंद्रिय शेतीच मोठं काम विदर्भात सुरू आहे. पोखरचे काम काही जिल्ह्यात कमी आहे.त्याला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करेन असे आस्वासनही त्यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून सबोधत असतात. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतोय. प्रत्येक कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान आणि सवांद कार्यक्रम राबवला. काही प्रश्न कृषी विभागाच्या पलिकडे असतात. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत 31 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. कोरोनाच संकट कमी झालं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देतील. तीन लाख पर्यंतचे कृषी कर्ज जे शेतकरी आणि मुदत विहरित भरतील तर त्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

‘देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?’, के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

भाजपचं टेन्शन वाढलं, देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राव यांची गर्जना

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.