Amravati Crime : मासेमारी करणाऱ्याला वनकर्मचाऱ्यांकडून लोखंडी सळईचे चटके, आदिवासी तरुणावर रुग्णालयात उपचार, मेळघाटमधील धक्कादायक प्रकार

अंकुशच्या शरीरावर लोखंडी सळईचे चटके बसलेत. त्यामुळं त्याच्या शरीराची आग होत आहे. हे प्रकरण समोर येताच अंकुशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनकर्मचारी चांगलेच हादरले.

Amravati Crime : मासेमारी करणाऱ्याला वनकर्मचाऱ्यांकडून लोखंडी सळईचे चटके, आदिवासी तरुणावर रुग्णालयात उपचार, मेळघाटमधील धक्कादायक प्रकार
मुलाच्या हव्यासापोटी गर्भवती पत्नीचा गळा दाबला, बेशुद्ध अवस्थेत डोंगरात फेकले
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 7:40 PM

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता येत नाही. एक आदिवासी तरुण मासेमारी (fishing) करताना वनकर्मचाऱ्यांना दिसला. त्यामुळं वनकर्मचाऱ्यांना राग आला. त्यांनी त्या तरुणासोबत अतिशय क्रूरतेने वागणूक दिली. या वन कर्मचाऱ्यांनी गरम लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आदिवासी तरुणानं केला आहे. या प्रकारनं आदिवासींमध्ये खळबळ माजली. ही जनावरांसारखी शिक्षा (punishment) देण्याचा अधिकार (rights) वनकर्मचाऱ्यांना कुणी दिला. असा आरोप आता आदिवासी संघटनांकडून केला जातोय. त्यामुळं वनकर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावं लागले.

लोखंडी सळईने दिले चटके

धारणी येथील धुळघाट रेल्वेचा अंकुश मावस्कर असं या आदिवासीचं नाव आहे. अंकूश तलावात मासेमारी करत होता. हा तलाव जंगलात येतो. त्यामुळं जंगलातील तलावात नियमानुसार मासेमारे करता येत नाही. पण, आदिवासींसमोर दुसरं काही पर्याय नसल्यानं तो लपून चोरून मासेमारी करत होता. हीच बाब वनकर्मचाऱ्यांना खटकली. ते स्वतःला जंगलाचे मालक समजू लागले. त्यामुळं त्यांनी लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आता आदिवासींकडून केला जातो.

तरुणावर रुग्णालयात उपचार

अंकुशच्या शरीरावर लोखंडी सळईचे चटके बसलेत. त्यामुळं त्याच्या शरीराची आग होत आहे. हे प्रकरण समोर येताच अंकुशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनकर्मचारी चांगलेच हादरले. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर येईल. हे सात ते आठ वनकर्मचारी यात सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळं या वनकर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.