AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भाविकांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

Dhamangaon Railway Samruddhi Mahamarg Accident: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरो टेम्पोपिकपमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या 7 जणांचा मृत्यू, तर गंभीर जखमी 12 आणि किरकोळ जखमी 6 जण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भाविकांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 12 जण गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात,
| Updated on: Oct 02, 2026 | 7:13 AM
Share

स्वप्नील उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी:  अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरो टेम्पोपिकपमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या 7 जणांचा मृत्यू, तर गंभीर जखमी 12 आणि किरकोळ जखमी 6 जण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणले त्यानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्व जखमींना वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

धामणगाव जवळ चॅनल 97 वर अपघात

शेगाव वरून दुर्गादेवी घेऊन वर्धा जात असताना धामणगाव जवळ चॅनल 97 वर अपघात झाला. समृद्धी महामार्गावर चॅनल 97 जवळ हा अपघात घडला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निकेतन कदम, धामणगाव नगराध्यक्ष अर्चना रोठे रुग्णालयात दाखल झाले. धामणगाव रेल्वे स्थानिक पोलीस, धामणगाव रेल्वे येथील स्थानिक नागरिक व पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी मदत झाली. अपघात कशामुळे घडला याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजळ ट्रक आणि टेम्पोचा हा भीषण अपघात घडला. शेगाव येथून दुर्गा मातेची मूर्ती घेऊन भाविक वर्ध्याकडे निघाले होते. भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण गंभीर जखमी आणि किरकोळ जखमींची संख्या 6 आहे. त्यांच्यावर वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मंगरूळ दस्तगीर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

वर्धा येथील सोमनाथ ले आऊट, सिंधी मेघे येथील हे भाविक भक्त असल्याची माहिती समोर येत आहे. नवरात्रौ उत्सव लवकरच सुरू होत आहे. त्याचीच तयारी सुरू होती. युवा नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे हे सदस्य मूर्ती खरेदीसाठी शेगावमध्ये आले होते. त्यांनी दुर्गादेवीची मूर्ती खरेदी केली. त्यानंतर धामणगाव रेल्वेजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जण ठार, तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

अपघातातील मयतांची नावं

1-घनश्यामजी पाटील

2-ओम गावंडे

3-सचिन बादलमवार

4-दत्ता कुळसुंगे

5-प्रवीण बकाने

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना