AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Bonde | ओबीसी, मराठ्यांना आरक्षण का नाही, अमोल मिटकरींनी आपल्या सरदाराला विचारावं, अनिल बोंडे यांनी डिवचलं

अमोल मिटकरी हे बाजारभोंगा आहेत. या बाजारभोंग्याच्या त्यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापूर्वी आपण आपल्या मालकाकडे जावं. शेपूट हलविण्यापूर्वी विचारावं की तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांना का छेळतात आहे. भाजप नेते अनिल बोंडेंची राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली.

Anil Bonde | ओबीसी, मराठ्यांना आरक्षण का नाही, अमोल मिटकरींनी आपल्या सरदाराला विचारावं, अनिल बोंडे यांनी डिवचलं
अनिल बोंडे, अमोल मिटकरी Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 25, 2022 | 3:13 PM
Share

अमरावती : भाजप नेते अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांच्यावर आज चांगलेच ताशेरे ओढले. अनिल बोंडे म्हणाले, अमोल मिटकारी हा बाजारभोंग्या आहे. या बाजरभोंग्याच्या सरदारानं म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठ्यांना, ओबीसींना फसविलं. हे सर्व मराठ्यांना समजलं. त्यामुळं अमोल मिटकरी हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतात. राज्याचे आणि केंद्राचे आरक्षणाचे कायदे अलग आहेत. राज्याच्या सूचीत मराठ्यांना आरक्षण मिळावं, म्हणून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी गायकवाड समिती नेमली. 32 टक्के मराठा समाज आहे. म्हणून 16 टक्क्यांचं आरक्षण दिलं. ते आरक्षण ओबीसींना धक्का न लावता दिलं. हे हायकोर्टात टिकून दाखवलं.

शरद पवारांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही

राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात तयारी केली नाही. मराठ्यांचं आरक्षण घालवलं. हे पाप यांच्या मालकांचं आहे. शरद पवारांचं आहे. हे अक्षम्य आहे. इम्पेरिकल डाटा जमा करा, ट्रीपल टेस्ट करा, मागासवर्गीय आयोग नेमा असं देवेंद्र फडणवीस सांगत होते. तेव्हा हे केंद्र सरकारकंड बोट दाखवत होते. आता बांठिया आयोग नेमला. आता म्हणतात. ट्रीपल टेस्ट करू. हा सर्व तुमचा नालायकपणा आहे. जाणीवपूर्वपण मराठ्यांना शरद पवार यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. तुमच्यात दम असेल, तर तुम्ही आरक्षण वाचवा. शिवराज चव्हाण यांनी ओबीसींचं आरक्षण वाचवलं. मग, तुम्ही ते का वाचवू शकत नाही, असा सवालही अनिल बोंडे यांनी केला.

शेपूट हलविण्याआधी विचारावं का छळता

अमोल मिटकरी हे बाजारभोंगा आहेत. या बाजारभोंग्याच्या त्यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापूर्वी आपण आपल्या मालकाकडे जावं. शेपूट हलविण्यापूर्वी विचारावं की तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांना का छेळतात आहे. भाजप नेते अनिल बोंडेंची राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळं अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करण्यापेक्षा आपल्या मालकाकडं जावं. शेपूट हालविण्यापूर्वी विचारावं तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांना का छळता, हे शरद पवारांना विचारावं, अशी टीका अनिल बोंडे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केली.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू