शरद पवारांचा अमरावती दौरा हिंदूचा अपमान करणारा; अनिल बोंडेंचा पुन्हा हल्लाबोल

शरद पवार यांनी एवढा मोठा दौरा करुनही आणि हिंदूचा सण असूनही त्यांनी आपल्या कार्यक्रमात एकही फोटो लावला नाही. या सणाऐवजी ईद असती तर शुभेच्छा दिल्या असत्या अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

शरद पवारांचा अमरावती दौरा हिंदूचा अपमान करणारा; अनिल बोंडेंचा पुन्हा हल्लाबोल
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 3:13 PM

अमरावतीः शरद पवार (Sharad Pawar) यांनी विदर्भाचा दौरा केला असला तरी त्यांनी विदर्भाला काहीच दिलं नाही. विदर्भाच्या दौऱ्यावर येऊनही त्यांनी विदर्भाच्या अनुशेशाबद्दल ते काहीच बोलले नाही, त्यामुळे शरद पवार यांचा साहेबांचा दौरा विदर्भाची (Vidarbh) निराशा करणारा होता अशी टीका भाजपचे आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा केला त्यावर जोरदार टीका भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी केली. शरद पवारानी काटोलमध्ये शेतकऱ्यांना दिलेले वचन विसरले आहेत. शरद पवार यांनी यांनी विदर्भ केला त्यावेळी हिंदुचा रामनवमी हा सण होता, मात्र या दौऱ्यात त्यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यामुळे हिंदुचा अपमान करणारा हा दौरा होता अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

शरद पवार यांनी एवढा मोठा दौरा करुनही आणि हिंदूचा सण असूनही त्यांनी आपल्या कार्यक्रमात एकही फोटो लावला नाही. या सणाऐवजी ईद असती तर शुभेच्छा दिल्या असत्या अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

यशोमती ठाकूर खरं बोलल्या

शोमती ठाकूर यांनी रविवारी शरद पवार यांच्याबद्दल एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असते. या ट्विटला अनुसरुनही अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. त्यांच्या या ट्विटवरुन त्यांना आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही काम करत नाहीत, हे यशोमती ठाकूर यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. यशोमती ठाकूर यांना हे सांगायचं असेल की तुम्ही रिमोट कंट्रोलने शरद पवार सरकार चालवतात त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटत असावे अशी टीका त्यांनी यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आघाडी सरकारमधील जे दोन मंत्री तुरुंगात आहेत, त्यावरही त्यांनी टीका केली.

एकही हिंदूला शुभेच्छा नाहीत

यावेळी ते म्हणाले की, यशोमती ठाकूर काहीच चुकीचं बोलल्या नाहीत, दोन दोन मंत्री यांचे जेलमध्ये असल्याचे सांगितले. अनिल बोंडे यांनी त्यांच्या दौऱ्याबद्दल धार्मिक मुद्दा बनवून त्यांनी रामनवमीनिमित्ताने एकही हिंदूला काल त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर अमोल मिटकरी यांच्याविरोधात मी तक्रार देणार असून त्यांनी माझ्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अमोल मिटकरी त्या पक्षात राहून लाल चाटण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

स्वतःची आरती ओवाळून घ्यायची

शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा केला कारण त्यांना स्वतःची आरती ओवाळून घ्यायची होती म्हणत देवेंद्र भुयारने स्वतःची गाडी स्वतः जाळली, असा फसवणूक करणारा माणूस तो आहे म्हणत अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्या दौऱ्याबद्दल जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या

24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं

Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’

Aurangabad | हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मशिदींचे भोंगे तोडले पाहिजेत, करणी सेनाअध्यक्षांचे औरंगाबादेत वक्तव्य