रोमानिया सीमेवर सैनिक विद्यार्थ्यांना झोडपत होते, अमरावतीच्या स्वराज पुंडने सांगितली अंगावर शहारे आणणारी घटना

| Updated on: Mar 06, 2022 | 5:08 PM

स्वराज पुंड हा युक्रेनमधील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी प्रथम वर्षांचे वैद्यकीय शिक्षण घेत होता. अशातच आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. अनेक भारतीय तेथे अडकवून पडले. आता स्वराज हा सुखरूप त्याच्या घरी पोहचला आहे.

रोमानिया सीमेवर सैनिक विद्यार्थ्यांना झोडपत होते, अमरावतीच्या स्वराज पुंडने सांगितली अंगावर शहारे आणणारी घटना
युक्रेनमधून अमरावतीत परत आलेल्या स्वराज पुंडने सांगितली थरारक कहाणी.
Image Credit source: tv 9
Follow us on

स्वप्निल उमप

अमरावती : मी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण (Medical Education in Ukraine) घेत होतो. पण मी डोळ्यासमोर जी परिस्थिती पहिली ती परिस्थिती आजही डोळ्यासमोरून जात नाही. आम्ही युक्रेनची सीमा पार करत रोमानियाकडे जात होतो. सिमेवर जेवणासाठी पाचशे विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या. अशावेळी सैनिक विद्यार्थ्यांना मारहाण (Soldiers beating students) करत होते. ही परिस्थिती पाहून खूप भीती वाटत होती. एक एक क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा होता असं अमरावतीचा स्वराज पुंड (Swaraj Pund of Amravati) tv9 मराठीशी बोलताना सांगत होता. स्वराज पुंड हा युक्रेनमधून परत आलाय. त्याचं त्याच्या कुटुंबाने व परिसरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्याच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले होते.

थंडगार वातावरणात अडकले मित्र

स्वराज म्हणाला, काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियाची परिस्थिती बिकट झाली होती. आम्हाला वाटत होतं रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकतो. आम्ही तेव्हा ठरवलं होतं की 20 मार्चला भारतात परत येऊ. पण भारतीय दूतावासाने सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही भारताला परत जा, असं स्वराज सांगत होता. युक्रेनमधील परिस्थिती अतिशय भयंकर आहे ती शब्दात सांगू शकत नाही. आजही माझे अनेक मित्र तेथे अडकले आहेत. युक्रेनमधील वातावरण थंड आहे. बर्फ सातत्याने पडतो.

बँकरमध्ये जेवण, पाणी मिळत नव्हते

बँकरमध्ये वेळेवर जेवण नाही. पाणी नाही चार-चार दिवसांपासून विद्यार्थी बॉर्डरवर बसले होते, असं स्वराजने सांगितले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने मी भारतात आलो. तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता दिघडे या आमच्या संपर्कात होत्या. आमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या, असंही त्याने सांगितले. लवकरात लवकर भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना परत आणावे. युक्रेनमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. जेव्हा एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला धक्का बसला. माझ्यासमोर रोमानियन सैन्याने गोळीबार केला. धक्काबुक्की करत होते, असं त्याने सांगितलं.

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक