Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एक व्यक्ती चार महिलांना वेगवेगळ्या बसस्थानकावर उतरवायचा. त्यानंतर त्या महिला स्कार्फ बांधून राहायच्या. बसमध्ये दागिने लंपास करायच्या. अशा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एक महिला आणि एका पुरुष आरोपीला अटक केली.

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 2:25 PM

नागपूर : कुकडे ले-आउट येथील नितीन मेश्राम (वय 48) हा चार आरोपी महिलांना आपल्या कारने ने-आण करीत होता. तो शहरातील वेगवेगळ्या बस स्थानकांवर या महिलांना उतरवायचा. त्या बसमध्ये चढल्या की, आपले काम करायच्या. महिलांचे दागिने, पर्स (Women’s Jewelry, Purses) लंपास करायच्या. त्यानंतर दागिने घेऊन बसस्थानकावर उतरायच्या. नितीन लगेच कारने जायचा आणि त्यांना परत घेऊन जायचा. शिवाय चोरी केल्यानंतर चोरीचा माल विकण्याची जबाबदारीही नितीनकडे होते. या महिला स्कार्प घालत असल्यानं त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शोधल्यानंतर बेलतरोडी पोलिसांना (Beltarodi Police) खबऱ्यांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर आरोपींपैकी कुंठीलालपेठ येथील रहिवासी ललिता बलवीर (वय 50) हिला अटक करण्यात आली. आणखी तीन महिला आरोपी पसार (Three Women Accused Passed) आहेत. त्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत. ललिताकडून 75 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत.

स्कार्फ बांधल्याने ओळखणे होते कठीण

शहरात गेल्या काही दिवसांपासून बसमधून महिलांचे दागिने, पर्स चोरी जात होते. 21 जानेवारीला वणी येथील ज्योत्सना जीवन लोंडे यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र बसमधून गहाळ झाले. त्या वर्धा मार्गावरील चिंचभवन येथून यवतमाळला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. डोंगरगावपूर्वीच चार महिलांनी ज्योत्सनाच्या बॅगमधील मंगळसूत्र लंपास केले होते. ज्योत्सनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आले. आरोपी महिलांनी स्कार्फ बांधल्याने त्यांना ओळखणे कठीण होते. पण, खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा शोध लावला. ललिताला अटक करण्यात आली असून, इतर तिघींचा शोध आता पोलीस घेत आहेत. एक व्यक्ती चार महिलांना वेगवेगळ्या बसस्थानकावर उतरवायचा. त्यानंतर त्या महिला स्कार्फ बांधून राहायच्या. बसमध्ये दागिने लंपास करायच्या. अशा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एक महिला आणि एका पुरुष आरोपीला अटक केली.

भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक, रात्री कारमध्ये तलवार घेऊन कुठे निघाले?

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.