भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक, रात्री कारमध्ये तलवार घेऊन कुठे निघाले?

नाकाबंदी दरम्यान तलवारीसहित दोन इसमांना अटक करण्यात आली. भंडारा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यामुळं फार मोठा अनर्थ टळला. हे आरोपी तलवारी कारमध्ये घेऊन कुठे जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक, रात्री कारमध्ये तलवार घेऊन कुठे निघाले?
भंडारा येथील नाकाबंदीत तलवारींसह अटक करण्यात आलेले दोन आरोपी पोलिसांसह. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 1:26 PM

तेजस मोहतुरे

भंडारा : चारचाकी वाहनात तलवारी (Sword in a four wheeler) घेऊन फिरत असलेल्या इसमांना भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) रात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम सांगितले जात आहे. दोघे रामटेक येथील रहिवासी आहेत. तलवारी वेळीच सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रात्री दरम्यान भंडारा येथील शास्त्री चौकात (Shastri Chowk at Bhandara) पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळेस वरठीकडून बीट्स चारचाकी क्रमांक MH 14 BX 9034 ही संशयास्पद येताना आढळली. नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांनी गाडी अडवून विचारपूस केली. गाडीत असलेले दोघे घाबरत असल्याचे लक्ष्यात आले.

तलवारी घेऊन रात्री फिरस्ती

गाडीची झडती घेण्यात आली. मागील सीटखाली एक मोठी व एक लहान अश्या दोन तलवारी आढळल्या. पोलिसांनी सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम यांना अटक केली. गाडी व तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, दोघे एखादा मोठा गुन्हा करायला जात असावेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिली. आता पोलीस आरोपींचा कसून तपास करत आहेत. ते नेमके तलावारी घेऊन कुठे जात होते, हे शोधणे गरजेचे आहे. या तलवारींचा दुरुपयोग कसा केला जाणार होता, याची शहानिशा केली जात आहे.

वर्धा येथील अपघातात एकाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्याच्या बाभुळगाव येथे मालवाहू चारचाकी वाहन पुलाखाली कोसळली. या वाहनात 13 प्रवासी होते. यातील एका महिलेचा मृत्यू झाला तर 12 प्रवासी जखमी झाले. नागपूर जिल्ह्याच्या वाकी येथून दर्शन घेऊन प्रवासी येत होते. जखमीमध्ये दोन वर्षाच्या मुलीचा सुद्धा सहभाग आहे. नागरिकांसह पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. वाघाडी नदीच्या पुलावरून वाहन खाली कोसळले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती आहे. मृतक आणि जखमी हे देवळी तालुक्याच्या पळसगाव येथील आहेत. सेलू पोलिसांत चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Photo – चार छाव्यांचे दर्शन एकाचवेळी घेतले का? चला तर मग बघा, मेळघात शिक्षकाला दिसलेले छावे

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.