नागपूरचे भारत बोदडे महापौर श्री 2022चे मानकरी, विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील इतर विजेते कोण?

इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन संघटनेच्या मान्यतेने नागपूर महानगरपालिका व बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. पोलीस विभागात कार्यरत नागपुरातील भारत बोदडे महापौर श्री 2022चे मानकरी ठरले.

नागपूरचे भारत बोदडे महापौर श्री 2022चे मानकरी, विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील इतर विजेते कोण?
विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेते प्रमुख पाहुण्यांसोबत. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:46 PM

नागपूर : वर्धा येथील पंकज ढाकुलकर यांना बेस्ट पोजर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छी विसा परिसर येथे शुक्रवारी विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा (Vidarbha Level Bodybuilding Competition) महापौर श्री-2022 चे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मागील 7 वर्षांपासून नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर (Corporator Narendra Borkar) हे नियमित विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून विदर्भातील शरीर सौष्ठवपटूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो व 80 किलोच्या वर या सहा वजनगटात स्पर्धा घेण्यात आली.

93 स्पर्धकांनी सहभाग घेतला

स्पर्धेत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील एकूण 93 स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक वाजनगटात एकूण 5 बक्षिसे होती. प्रत्येक गटात पहिले बक्षीस 20 हजार रुपये, दुसरे 15 हजार रुपये, तिसरे 10 हजार रुपये, चवथे 7 हजार रुपये, पाचवे 5 हजार रुपये विजेत्यांना प्रदान करण्यात आले. नागपूरचा भारत बोदडे हा ‘महापौर श्री-2022 चा मानकरी ठरला त्याला. 51 हजार रुपये रोख व चषक देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गौरवान्वित केले. ‘बेस्ट पोजर’ वर्धा येथील पंकज धाकुलकर यांना 31 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरव करण्यात आला. परीक्षणाची जबाबदारी विदर्भ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली.

इतर गटातील विजेते

60 किलो – राजेश क्षीरसागर (यवतमाळ), सुरज बोधिले (अमरावती), सलीम शेख (अकोला), किरण ठाकरे (चंद्रपूर, नावेद शेख (अमरावती). 65 किलो – योगेश बन्सोड (अकोला), अक्षय टिकेकर (अमरावती), शुभम यादव (अकोला), शुभम बागडे (यवतमाळ), हर्ष शाहु (नागपूर). 70 किलो – योगेश शेंडे (नागपूर), अक्षय गानेर (नागपूर), विक्रांत गोडबोले (नागपूर), अक्षय इकोनकर (अमरावती), सुयश जदिवे (अकोला). 75 किलो – प्रसाद थोटे (अमरावती), आलेख चौधरी (नागपूर), सोयब अली(अकोला), राज अटकापूरवार (चंद्रपूर), मोनिष ठाकुर (नागपूर). 80 किलो – पंकज ढाकुलकर (वर्धा), रोहित मोरे (चंद्रपूर), शशांक शेंडे (नागपूर), बिलाल शेख (नागपूर), सलमान शेख (नागपूर). 80 किलोवरील – भारत बोदडे (नागपूर), कमलेश कश्यप (चंद्रपूर), आकाश राजपूत (अमरावती), निनेश जोशी (नागपूर), किसन तिवारी (नागपूर).

Photo – चार छाव्यांचे दर्शन एकाचवेळी घेतले का? चला तर मग बघा, मेळघात शिक्षकाला दिसलेले छावे

वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!

रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई, 3 किलो सोने, 27 किलो चांदी जप्त! बिहारच्या आरोपींना चंद्रपुरात अटक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.