AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, मांजरखेडजवळ ट्रकचा भीषण अपघात

समृद्धी महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आतापर्यंत अनेकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला आहे.

Amaravati Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, मांजरखेडजवळ ट्रकचा भीषण अपघात
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 11:12 AM
Share

अमरावती / 17 ऑगस्ट 2023 : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. समृद्धी महामार्गावरील मांजरखेड जवळ ट्रकचा भीषण अपघात झाला असून, दोघे जागीच ठार झाले आहेत. भरधाव ट्रक सिमेंटच्या कठड्याला धडकल्याने हा अपघात घडला. मोहम्मद फैजान मोहम्मद अली आणि क्लिनर मोहम्मद मुमताज मोहम्मद शेख अशी अपघाताती मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. मुंबईच्या दिशेने जात असताना ट्रकला अपघात झाला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्ात घेतले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.

डुलकी लागली अन् घात झाला

अपघातग्रस्त ट्रक नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरुन चालला होता. यावेळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेडजवळ मध्यरात्रीच्या चालकाला डुलकी आली आणि ट्रक सिमेंटच्या कठड्यावर आदळला. यामुळे भीषण अपघात होऊन चालक आणि वाहक दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर मूळगावी पाठवले

घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या मूळगावी बिहार येथे पाठवण्यात आले. पुढील तपास ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात तळेगाव पोलीस करीत आहे. सदर समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.