Nana patole : सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी

Nana patole : सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी
अमृता फडणवीस

सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं आहे. याआधीही अमृता फडणवीस ठाकरे सरकारवर वेळोवेळी ट्विटरवरून जोरदार निशाना साधताना दिसून आल्या आहेत, आता पुन्हा अमृता फडणवीस या ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 18, 2022 | 2:53 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात (Nana patole) भाजप सध्या चांगलीच आक्रमक झालीय, नाना पटोलेंच्या मोदींवरील (Pm modi) टिकेनंतर भाजपकडून राज्यभर नाना पटोलेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंवर सडकून टीका केली आहे. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीसांनी केलीय. या वादात आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही (Amruta Fadnavis) उडी घेतलीय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीसांनी ट्विटवरून शेरोशायरी करत पटोलेंवर निशाना साधला आहे. सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं आहे. याआधीही अमृता फडणवीस ठाकरे सरकारवर वेळोवेळी ट्विटरवरून जोरदार निशाना साधताना दिसून आल्या आहेत, आता पुन्हा अमृता फडणवीस या ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीसांचे ट्विट काय?

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे यायाच अर्थ, मोदींसारख्या सुर्याला बुडवायचे इरादे ठेवताता नाना पटोलेंसारखे छोटे नेते, पण त्यांना हा अंदाज नाही की, प्रगतीच्या उजेडाला बुडवण्याच्या नादात ते स्वताच जळून खाक होतील, असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे, त्यामुळे यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसतेय. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत. मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धकमी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधा FIR ही दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय. अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केलीय. त्यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झालंय. आता ते घाबरलेत. चारही बाजूनं टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत. पण कितीही पळ काढला तरी त्यांच्या मनातले विष त्यांच्या ओठावर आलंय. नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ? एखादा माणूस मी मारू शकतो असं म्हणत असेल तर तो गुन्हाच आहे ! आणि तो दाखल झाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें