Anand Shinde | गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे (Anand Shinde) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Anand Shinde | गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे (Anand Shinde) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने ही दुखापत गंभीर नाही. पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

आनंद शिंदे हे सोलापूरकडे जाताना मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूरजवळच्या बळपुडी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर आनंद शिंदे यांना इंदापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने आनंद शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. गाडीत आनंद शिंदे यांच्यासह चौघेजण होते.

कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. खणखणीत आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *