लवकरात लवकर भरपाई द्या; नासलेली पिकं घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली

हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. | Hasan Mushrif

लवकरात लवकर भरपाई द्या; नासलेली पिकं घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली

अहमदनगर: राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गुरुवारी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी आजपासून पाथर्डीतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाला तोंड द्यावे लागले. या शेतकऱ्यांनीा मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. (NCP leader Hasan Mushrif face Farmers anger)

काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत देणारे पॅकेज देऊ, असे वक्तव्य केले होते. केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

 

विरोधकांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट मदत केली का?
राज्यातील विरोधक सत्तेत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना कधी सरसकट मदत केली का?, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला. अनेक वर्ष आम्ही राज्याचा कारभार केला, जनतेला कशी मदत मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहrत आहे. त्यांची नाळ आमच्या सोबत जोडली गेली आहे. पंचनामे केल्याशिवाय ही मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायची ? याचे आकलन होत नाही. पंचनामे करावेत असा केंद्र सरकारचा सुद्धा आग्रह असतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 3 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा?

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येत्या एक-दोन दिवसांत आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झाली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पॅकेजसंदर्भात घोषणा होऊ शकते.

सरकारमधील सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार, पंचनाम्यांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 3 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

(NCP leader Hasan Mushrif face Farmers anger)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *