Anil Parab : किरीट सोमय्यांची केवळ नौटंकी, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा, परबांचं खुलं आव्हान

Anil Parab : किरीट सोमय्यांची केवळ नौटंकी, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा, परबांचं खुलं आव्हान
अनिल परब सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक
Image Credit source: tv9

रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र शिवसेनेकडूनही (Shiv sena)  किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत.

दिनेश दुखंडे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 26, 2022 | 4:50 PM

मुंबई : दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या (Anil Parab) मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र शिवसेनेकडूनही (Shiv sena)  किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. असेही परब म्हणाले. तसेच किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत. ते वातावरण खराब करत आहेत. सोमय्या यांच्यामुळे जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे, असेही परबांनी सांगितले आहे.

सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात जाणार

तसेच बाबत मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम ते करत आहेत. म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, असा इशाराही परबांनी दिला आहे. तसेच किरीट सोमय्या रिसॉर्ट तोडायला कर्मचारी आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. हिंमत असेल तर तोडून दाखवा, असे खुले आव्हान त्यानी सोमय्यांना दिले आहे. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे हे कोण ठरवणा रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल.निल परब यांचे मुद्दाम नाव घेऊन वातवरण खराब करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

कोकणात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत. त्यांच्यावर पण कारवाई करावी, असे म्हणत त्यांनी मालवणमधील नारायण राणे यांच्या बंगल्याकडेही नाव न घेता इशारा केला आहे. तसेच गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू असं सांगितलं, पण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना, असेही परबांनी यावेळी बाजवले आहे. राष्ट्रवादीचा इशारा झुगारून सोमय्या कोकणात पोहोचले. मात्र कशेडी घाटता त्यांना पोलिसांनी अडवलं आणि नोटीस घेण्यास सांगितली. मात्र यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद झल्याचे दिसून आले.

फोटो काढला स्मृती इराणी यांनी आणि क्रेडीट घेतलं दुसऱ्यानं, स्मृती इराणी म्हणाल्या…

विहिरीत जीव देईन पण पक्ष सोडणार नाही, श्रीकांत जिचकारांना nitin gadkari असं का म्हणाले?

चंद्रपुरातील बगीच्याच्या उद्घाटनावरून वाद; पालकमंत्री, खासदार, आमदारांना निमंत्रणचं नाही, आमदार म्हणतात, मी येणारच!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें