चंद्रपुरातील बगीच्याच्या उद्घाटनावरून वाद; पालकमंत्री, खासदार, आमदारांना निमंत्रणचं नाही, आमदार म्हणतात, मी येणारच!

चंद्रपुरातील बगीच्याच्या उद्घाटनावरून वाद; पालकमंत्री, खासदार, आमदारांना निमंत्रणचं नाही, आमदार म्हणतात, मी येणारच!
चंद्रपूर येथे बगीच्याच्या उद्घाटनावरून वाद.
Image Credit source: tv 9

चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदाराला आमंत्रित नाही. त्यामुळं उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा काँग्रेसनं दिलाय. तर दुसरीकडं आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यक्रमाला बोलावले नाही तरी 'मी जाणार आणि उद्घाटन करणारच' असं म्हणत म्हणत शहरात "होय मी येणारच आहे"चे बॅनर लावले. त्यामुळं आज संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात काय होत ते पाहावं लागले.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 26, 2022 | 3:41 PM

चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती आझाद बगीचा उद्घाटनाबाबत मोठा राजकीय वाद उभा ठाकला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते आझाद बागेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी वितरित केलेल्या निमंत्रणपत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister), खासदार आणि स्थानिक अपक्ष आमदाराला आमंत्रित केलं नसल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळं उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar ) यांनी कार्यक्रमाला बोलावले नाही तरी ‘मी जाणार आणि उदघाटन करणारच’ असं म्हणत म्हणत शहरात लावलेले “होय मी येणारच आहे”चे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्या पत्रिकेमुळे आगामी निवडणुकीआधीच या उद्घाटनावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

प्रोटोकॉलचं पालन होतंय?

चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. आमदार किशोर जोरगेवार हे अपक्ष आहेत. तर खासदार आणि पालकमंत्री हे काँग्रेसचे आहेत. मनपाच्या हद्दीत हा बगीचा सज्ज झालाय. याचे उद्घाटन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रोटोकॉलनुसार आयुक्तांसह स्थानिक खासदार, आमदार यांना बोलाविणं आवश्यक आहे. पण, तसं काही होणार नाही. त्यामुळं आयुक्तांनी हा मनपाचा कार्यक्रम नसल्याचं जाहीर केलं. एप्रिलमध्ये चंद्रपूर महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळं कामाच्या श्रेयवादातून हे होत आहे. हा बगीचा नगरसेवक संजय कंचल्लावार यांच्या प्रभागात शहराच्या मध्यभागी होत आहे. महापौर राखी कंचल्लावार आहेत. नागरिक या बगीच्याची प्रतीक्षा करत आहेत. याचे श्रेय आता कुणाला यावरून हे सारं सुरू आहे. हा कार्यक्रम कसा होतो, यावर सर्व अवलंबून आहे.

Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी

Akola | शिवसेना आमदार संतोष बांगरला राज्यात फिरू देणार नाही, वंचितचे राजेंद्र पातोडे असं का म्हणाले?

Video | राजकारण जाईल चुलीत, पण इथलं गव्हर्नन्स ठीक रहावं, आता त्यालाच बट्टा लागतोय; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें