AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट

आज अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी यावेळी काही कागदपत्रं देखील अजितदादांकडे सादर केली आहेत.

'त्या' कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
| Updated on: Jan 27, 2025 | 8:27 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, संतोष देशमुख हत्याप्रकरणात आता अंजली दमानिया यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी यावेळी काही कागदपत्रं अजित पवार यांच्याकडे सादर केली, तसेच त्यांनी अजित पवार यांच्याकडे देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भेटीनंतर नेमकं काय म्हणाल्या दमानिया?  

अजित पवार यांची भेट घेतली, त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्याकडे मी काही कागदपत्रं सादर केली आहेत, बीडमधील सर्व कंपन्यांच्या बॅलेन्स शीट त्यांना दिल्या. या सर्व बॅलन्स शीटवर मुंडे पती-पत्नीच्या सह्या आहेत. असा दावा दमानिया यांनी केला आहे. मुंडे -कराड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत, याची माहिती दादांना दिली. काही रिल्स देखील दाखवल्या, बीडमध्ये कसं दहशतीचं वातावरण आहे, याची कल्पना अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार यांनी माझं बोलणं अतिशय गांभीर्यानं ऐकून घेतलं. सर्व कागदपत्रं पाहिले. त्यानंतर त्यांनी मला असं अश्वासन दिलं की ते उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, हे कागदपत्रं ते मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहेत. त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी मला सांगितल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान दमानिया यांच्या या भेटीमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावरून देखील अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्याचे रिपोर्ट पाहिले, त्याला काहीही झालं नाही. तो ठणठणीत आहे, मग त्याची बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात नेलं होतं का? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?