AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजली दमानियांचे पुरावे एसआयटीकडे; कोणाची विकेट पडणार?

अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

अंजली दमानियांचे पुरावे एसआयटीकडे; कोणाची विकेट पडणार?
anjali damania
| Updated on: Jan 28, 2025 | 6:52 PM
Share

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, या भेटीदरम्यान त्यांनी काही कागदपत्रं अजित पवार यांच्याकडे सादर केले होते. त्यांनी बीडच्या काही कंपन्यांचे बॅलेन्स  शिट देखील अजित पवार यांना दाखवले होते. ज्यावर मुंडे पती-पत्नीच्या सह्या असल्याचा दावा दमानिया यांच्याकडून करण्यात आला होता. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक संबंध आहेत याची कल्पना आपण अजित पवार यांना दिल्याचं या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं. दरम्यान अंजली दमानिया यांच्या भेटीनंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिले होते. ते मी पाहिले. मी आज सध्यांकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. मात्र त्यांना नागपूरला जायचं होतं, त्यामुळे आताच भेट घेतली. मी दमानियांची कागदपत्रं मुख्यमंत्र्यांना दाखवली. ते म्हणाले त्यांनी माझी देखील भेट घेतली आहे. त्यांनी मला देखील कागदपत्रं दिली आहेत. मात्र जेव्हा कोणी पुरावे देतं तेव्हा त्याची शाहानीशा होणं गरजेचं असतं त्यामुळे ते तपासणीसाठी एसआयटीकडे आणि सीआयडीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तूस्थिती समोर येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी माला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं आहे. जी घटना बीड जिल्ह्यात घडली, ज्या पद्धतीनं सरपंचाची हत्या झाली या घटनेत दोषींना फाशी दिली पाहिजे तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे. कुणाची आणखी नावे समोर आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. मात्र कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही. ही माझी, मुखमंत्र्यांची आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप