AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, निवडणुकीपूर्वीच बसणार मोठा धक्का?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, निवडणुकीपूर्वीच बसणार मोठा धक्का?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2025 | 4:28 PM
Share

मनिष मासोळे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 232 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. कुणाल पाटील यांच्यावतीनं आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात कुठल्याही  काँग्रेस नेत्याचे फोटो आणि बॅनर नव्हतं, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर हा धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.

कुणाल पाटील यांनी नेमकं काय म्हटलं

माझा पराभव झाला असला तरी या तालुक्यातील किमान 1 लाख लोकांनी मला मते दिली आहेत. ज्यांनी नाही केलं त्यांनी देखील मला गेल्या दोन पंचवार्षिकला मतदान केलं आहे. त्यामुळे 2029 ला कुणाल पाटील उभा राहिला तर लोक 2 लाख मतांनी निवडून देतील. आज या मेळाव्यात कार्यकर्ते पण माझ्यासोबत आहेत, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल,  मात्र मी उद्या भाजपात गेलो किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तोच सन्मान मला असणार आहे. वेळ जशी येईल तसा निर्णय घेवू,  जो पण मी निर्णय घेईल तो तुमच्या होकारेनच घेईल, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!