AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोदावरी, गंगापूर कालव्यातील पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाची 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत

गंगापूर डावा तट कालवा, गोदावरी उजवा, डावा तट कालवा लाभक्षेत्रातील पाणी घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी आणि पाणी वापर संस्थांनी आपले अर्ज 10 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे.

गोदावरी, गंगापूर कालव्यातील पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाची 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण भरले आहे.
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 12:31 PM
Share

नाशिकः नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील गंगापूर डावा तट कालवा, गोदावरी उजवा-डावा तट कालवा, आळंदी डावा-उजवा तट कालवा, पालखेड अन् कडवा उजवा तट कालवा इत्यादी लाभक्षेत्रातील पाणी प्रवाहीसह उपसा सिंचनाने घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी आणि पाणी वापर संस्थांनी आपले अर्ज 10 नोव्हेंबर पर्यंत सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी केले आहे.

वाकी, भाम, भावली, दारणा, मुकणे, वालदेवी, गंगापूर, कडवा, गौतमी, गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांचे जलाशय व नदी यावरून तसेच दारणा-गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागाच्या अधिपत्याखालील एकूण 10 व कोल्हापूर बंधाऱ्याचे पाणी प्रवाही उपसा सिंचनाने पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या धरणक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमुना नंबर 7 प्रवर्गात रब्बी हंगाम 2021-22 संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार, फळबाग, बारमाही पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळा हंगाम अखेर पर्यंत पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून उर्वरित पाण्याचा शेतीच्या पिकांसाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्यात येणार असल्याचे, कळवण्यात आले आहे.

सहकारी संस्थांना स्वतंत्र कोटा

पाणीपुरवठा सुलभ व्हावा यासाठी मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. पाणीपुरवठा यामुळे होणारे पिक नुकसानीची जबाबदारी ही त्या शेतकऱ्याची व्यक्तीश: असणार आहे. यासाठी शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. ज्या कालव्यावर अथवा चारीवर नमुना 7 ची प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा किंवा उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून मंजुरी देण्यात येणार आहे. सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर 7 वर पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्याकरीता सहकारी पाणी वापर संस्थेतील लाभधारकांनी संस्थेकडेच पाणी मागणी नोंदविणे आवश्यक आहे. सहकारी पाणी वापर संस्थेस तिच्या लागवडीलायक क्षेत्राच्या प्रमाणात स्वतंत्ररित्या पाणी कोटा मंजूर करण्यात येणार आहे.

नुकसान भरपाई मिळणार नाही

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करतांना सूक्ष्म सिंचनावर भर देवून, रब्बी हंगाम मंजूर क्षेत्राच्या नादुरूस्त असलेल्या पोटचाऱ्या लोक सहभागातून ताबडतोब दुरुस्त करुन घ्याव्यात, नादुरुस्त पोटचाऱ्यांमुळे पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊन, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच उपलब्ध पाणीसाठ्या नुसार आवर्तन कालावधीमध्ये कमी जास्त अंतराने पाणीपुरवठा झाल्याने पिकांचे काही अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.

ज्यांच्या नावाचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे व ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार नाही. तसेच कालव्यावरील मंजूर उपसाधारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा पाईप लाईनव्दारा पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल. – अ. रा. निकम, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाशिक

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाला चार आठवड्यांचा दिलासा, अटक टाळण्यासाठी धडपड

इलेक्शनचा धुरळा, नाशिक महापालिकेत 151 नगरसेवक होणार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.