मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी संस्थांना लागू करा; शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात नाशिकमध्ये मागणी

साखर सम्राट म्हटलं की बदनामीचा शिक्का लावला जातो. तसाच शिक्का शिक्षण सम्राट म्हटलं की लावला जातो. ते योग्य नाही. कारण काहीच शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी संस्थांना लागू करा; शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात नाशिकमध्ये मागणी
नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले.
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 2:50 PM

नाशिकः साखर सम्राट म्हटलं की बदनामीचा शिक्का लावला जातो. तसाच शिक्का शिक्षण सम्राट म्हटलं की लावला जातो. ते योग्य नाही. कारण काहीच शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार घडतात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिकमधील गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या अधिवेशनात मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी शिक्षण संस्थांना लागू करा, अशी मागणी करण्यात आली.

परराज्यातील विद्यार्थी महाराष्ट्रात

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र हा शिक्षणात प्रगत असून त्याचे श्रेय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. महिलांनाही शिक्षण दिले. याशिवाय स्व. कर्मवीर भाऊराव पाटील, स्व. वसंतदादा पाटील तसेच रयतच्या माध्यमातून खासदार शरदचंद्र पवार यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्व. वसंतदादा पाटील यांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. त्यातून महाराष्ट्रात शिक्षण संस्थाचा विकास होऊन परराज्यातून विद्यार्थी आज शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रात येत आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळात संस्था अडचणीत

भुजबळ म्हणाले की, काही शिक्षण संस्थामध्ये गैरप्रकार होत असले, तरी सगळ्याच शिक्षण संस्था या वाईट आहेत असे नाही. अनेक शैक्षणिक संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. साखर सम्राट म्हटलं तर बदनामीचा शिक्का लावला जातो, तसाच शिक्का शिक्षण सम्राट म्हटलं की लावला जातो. हे योग्य नाही. कोरोना काळात शैक्षणिक संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता अर्थचक्र सुरू झाले असून महाविकास आघाडी सरकार योग्य ते सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासगी संस्थातून मोफत शिक्षण द्या

यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा यासोबत शिक्षण क्षेत्राला सावरण्याची आवश्यकता आहे. शासनाने यासाठी आवश्यक मदत करावी. मोफत शिक्षण कायद्याच्या तरतुदीत खासगी शिक्षण संस्थांना तरतूद नसल्याने संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे. मोफत हक्क शिक्षण कायद्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांचा समावेश करण्यात यावा. तसेच शिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी यासह विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इतर बातम्याः

युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.