ना योग्य मानधन, ना आरोग्य सुरक्षा…आता निर्णायक लढाई हाच पर्याय, 72 हजार आशा वर्कर्स संपावर जाणार

| Updated on: Jun 14, 2021 | 3:05 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात पण देत काहीच नाही, अशी व्यथाही एम. ए. पाटील यांनी मांडली. (ASHA workers across Maharashtra to go on strike due to various demand)

ना योग्य मानधन, ना आरोग्य सुरक्षा...आता निर्णायक लढाई हाच पर्याय, 72 हजार आशा वर्कर्स संपावर जाणार
ASHA worker (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

ठाणे : वारंवार गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांचे मानधन कमी देत आहे. त्यामुळे जर आशा कर्माचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आमचा संप अटळ आहे, असा थेट इशारा आशा वर्करनेचे कृती समिती अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे एकूण 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करणार आहे. (ASHA workers across Maharashtra to go on strike due to various demand)

राज्यभरात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप करा, आमचे आम्ही बघून घेऊ असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात पण देत काहीच नाही, अशी व्यथाही एम. ए. पाटील यांनी मांडली.

मागण्या काय?

?कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज 300 रुपये मानधन मिळावं.
?आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत.
?आशां ना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत.
?तब्बल 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.
?अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही.
?नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागते.
?कोरोनासाठी जवळपास सर्व प्रकारची सहाय्यता करावी लागते

आमच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही 

सरकार आमची फसवणूक करतं आहे. वेठबिगार, गुलाम म्हणून राबवू घेत आहे. मात्र आमच्या सुरक्षेची कोणतीही काळजी कोणीही घेत नाही. केंद्र सरकार कोरोना कामाचे रोज 35 रुपये प्रमाणे महिन्याला 1 हजार रुपये देते, तेही वेळेवर नाही. राज्य सरकार एकूण 4 हजार देते, मात्र आरोग्य विभागाची 72 प्रकारची कामे कोरोनामुळे बंद पडली. त्यामुळे 3 हजार रुपये मानधन कापले जाते, असे अनेक मुद्दे आशा वर्कर संघटनेने मांडले आहेत.

निर्णायक लढाई हाच पर्याय

आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त इत्यादी सर्वांशी वेळोवेळी बोलणे झाले आहे. गेल्या दीड वर्ष कोरोना काळात आशांनी काम केले आहे. अजूनही करत आहेत. मात्र सरकारने आश्वासन वगळता काहीच दिले नाही. ना आरोग्य सुरक्षा, ना विमा, ना योग्य मानधन…त्यामुळे निर्णायक लढाई हाच पर्याय सरकारनेच आशांपुढे ठेवला आहे, असे आशा वर्कर संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

(ASHA workers across Maharashtra to go on strike due to various demand)

संबंधित बातम्या : 

‘लसीकरण करा, जागा देतो, माणसं पुरवतो, त्यांना पगारही देतो, फक्त लसी द्या, पण केडीएमसीचं दुर्लक्ष’

नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ, 24 तासात तब्बल 510 मृत्यूची पोर्टलवर नोंद