AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar: पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

Ashish Shelar: नाल्यांना जलपर्णीचा पूर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना? असा सवाल करत नाल्यातील या जलपर्णी कधी साफ होणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

Ashish Shelar: पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला
पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोलाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 4:45 PM
Share

मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे. नाल्यांना जलपर्णीचा पूर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना? असा सवाल करत नाल्यातील या जलपर्णी कधी साफ होणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. आम्ही दौरे करायला लागताच पन्नास लाखाच्या घड्याळात ज्यांचे टायमिंग चुकले ते आता जागे झाले, अशी टीका ही शेलार यांनी शिवसेनेचं (shivsena) नाव न घेता केली. शेलार यांनी पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर (yogesh sagar), पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी या नालेसफाई पाहणीच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाने नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. आजच्या तिसऱ्या दिवशी मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर या भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. कामांना अद्याप कुठेही वेग आलेला नाही. कामांना गती देण्याची गरज आहे. मुळातच कामांना मंजूरी देण्यास विलंब झाला. भाजपाने रेटा वाढविला त्यानंतर प्रशासन जागे झाले. आम्ही नाल्यावर भेटी देऊ लागताच प्रशासन आणि कंत्राटदारांची पळापळ सुरू झाली आहे. पण ज्यांची ही जबाबदारी होती ते कारभारी मुदत संपली असं सांगून फरार झाले होते. भाजपाने दौरे सुरू करताच पालकमंत्र्यांनी आता दौरा करण्याचे जाहीर केल्याचे वाचनात आले. ज्यांचे पन्नास लाखांच्या घड्याळात टायमिंग चुकले होते त्यांना भाजपामुळे जाग आली आहे. मुंबईकरांची आता आठवण झाली, अशी टीका शेलार यांनी केली.

कामे कधी पूर्ण करणार?

डहाणूकर वाडीतील नाला असो वा पोयसर नदी यांना जलपर्णीचा पूर्ण विळखा पडला असून अद्याप अनेक ठिकाणी कामाला सुरूवात झालेली नाही. तर काही नाल्यामध्ये आता एक एक जेसीबी, पोकलेन मशिन उतरवून काम करण्यात येते आहे. त्यामुळे कामांची गती वाढवणे आवश्यक असून या वेगाने गेल्यास कधी कामे पूर्ण होणार ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

यांना रेल्वे उड्डाण पुलावर बोलण्याचा अधिकार आहे का.?

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल येथील उड्डाणपुलाला होत असलेल्या विलंबा बाबत रेल्वेवर टीका केली आहे. हा रेल्वे उड्डाणपुल लवकर व्हावा ही आमचीही मागणी आहे. पण आज जे अचानक जागे झाले. त्यांना उड्डाण पुलाबाबत बोलण्याचा अधिकार आहे का? ज्यावेळी प्रभादेवी आणि परेल येथील पादचारी पुल कोसळला, मुंबईकंराचे मृत्यू झाले त्यावेळी आम्ही केंद्र सरकारला विनंती करुन निकड लक्षात आणून देत सैन्य दलाला मुंबईत पाठविण्याची विनंती केली. सैन्य दल आले त्यांनी विक्रमी वेळेत पादचारी पूल पूर्ण केले. पण जेव्हा मुंबईकरांसाठी सैन्य दल रेल्वे पटरीवर उतवरले गेले तेव्हा, आज जे बोलत आहेत त्यांचा पक्ष त्यावर त्यावेळी टीका करीत होता. त्यामुळे आज तुम्ही बोलण्याचा नैतिक अधिकार गामवून बसला आहात, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

Phone Tapping : “मी पुन्हा येईन” या नादात फोन टॅपिंग, खडसेंचा फोन 67 दिवस टॅप केल्याचा आरोप

Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल

सुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबले

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.