AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, रुग्ण म्हणून गेला अन् डॉक्टरलाच…

अशोक खरातने पोटाच्या आजाराचा वापर करून डॉ. नंदकिशोर कातोरे यांना जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्ण म्हणून आलेला खरात थेट विश्वस्त कसा बनला? याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, रुग्ण म्हणून गेला अन् डॉक्टरलाच...
Ashok Kharat new photo
| Updated on: Mar 31, 2026 | 2:04 PM
Share

भोंदूगिरी आणि अघोरी कृत्यांच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याप्रकरणी नाशिक पोलीस, एसआयटीकडून सखोल चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान मोठमोठे खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहे. आता अशोक खरातबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. अशोक खरातला पोटाचा गंभीर विकार होता. याच आजाराचा शस्त्र म्हणून वापर करून त्याने आपले नेटवर्क मजबूत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नाशिकमधील नामवंत शिवनिका संस्थेचे विश्वस्त डॉ. नंदकिशोर कातोरे यांचे नाव समोर आल्याने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आजाराच्या बहाण्याने जवळीक

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा पोटाच्या तीव्र त्रासामुळे त्रस्त होता. याच उपचारासाठी त्याने डॉ. नंदकिशोर कातोरे यांची भेट घेतली होती. डॉ. कातोरे यांनी खरातवर दोन वेळा उपचार केले. मात्र, रुग्ण म्हणून आलेला अशोक खरात केवळ उपचारापुरता मर्यादित राहिला नाही. अशोक खरात हा त्यांच्याकडून उपचार घेत असतानाच त्याने आपल्या भोंदूगिरीची भुरळ डॉक्टरांना घातली. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधली.

रुग्ण ते विश्वस्त: संशयास्पद प्रवास

अशोक खरातने डॉक्टरांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्यांना शिवनिका संस्थेच्या विश्वस्त पदासाठी गळ घातली. एका रुग्णाच्या सांगण्यावरून डॉक्टर थेट संस्थेचे विश्वस्त कसे बनले? आणि यामागे खरातचा कोणता मोठा डाव होता? याचा शोध आता विशेष तपास पथक (SIT) घेत आहे. खरातने आपल्या आजाराचे भांडवल करून डॉक्टरांना भावनिक साद घातली की त्यांना अघोरी विद्येच्या जाळ्यात ओढले, याचाही तपास सध्या केला जात आहे.

SIT च्या तपासाकडे सर्वांचे लक्ष

अशोक खरातच्या पोटाच्या आजाराचे नेमके स्वरूप काय होते? त्याने या आजाराचा वापर करून आणखी किती बड्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. SIT च्या चौकशीत डॉ. कातोरे आणि खरात यांच्यातील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातून नाशिकमधील भोंदूगिरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती