AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचा विष प्राशन करण्याचा प्रयत्न, प्रशासनात खळबळ

मला सदस्य  घेतले. परंतु कोणत्याही प्रक्रियात मला सहभागी करुन घेतले जात नाही. मला विकास निधी दिला जात नाही. जिल्हाधिकारी म्हणतात, मंत्र्यांकडे, आमदारांकडे जा...माझा सातत्याने अपमान करण्यात आला. मी रस्त्याची कामे मागितले. त्यासाठी निधी दिला नाही.

धक्कादायक, निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचा विष प्राशन करण्याचा प्रयत्न, प्रशासनात खळबळ
एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी निधी मिळत नसल्याने नाराज झाला. (फाईल फोटो)
| Updated on: Sep 18, 2024 | 12:45 PM
Share

राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपसह इतर लहान पक्षसुद्धा आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यावर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी नाराज झाले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार करण्यात येत होती. आता परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने निधी मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ज्ञानोबा व्हावळे यांनी विष प्रशान करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या नियोजन समितीतून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावडे यांनी केला विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

काय घडला प्रकार

परभणी जिल्हा नियोजन समितीत निधी मिळत नसल्याने विरोधकच नाही तर सत्ताधारी गटातही नाराजी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्यही निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यातूनच शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. नियोजन समितीतून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावळे यांनी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कमुळे पुढील अनर्थ टळला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने निधीसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीत सगळे अलबेल नाही, हे दिसून येत नाही.

ज्ञानोबा व्हावळे

सातत्याने अपमान झाल्याने निर्णय

ज्ञानोबा व्हावडे म्हणतात, मला सदस्य  घेतले. परंतु कोणत्याही प्रक्रियात मला सहभागी करुन घेतले जात नाही. मला विकास निधी दिला जात नाही. जिल्हाधिकारी म्हणतात, मंत्र्यांकडे, आमदारांकडे जा…माझा सातत्याने अपमान करण्यात आला. मी रस्त्याची कामे मागितले. पालकमंत्र्यांना त्यासाठी नऊ वेळा भेटलो तरी मला निधी मिळाला नाही, असे ज्ञानोबा व्हावडे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये तिघांनी संपवले जीवन

नाशिकच्या गौळाने गाव परिसरातील राहणाऱ्या तिघांनी आत्महत्या केली. आई-वडील आणि मुलगी आशा तिघांनी आत्महत्या केली. विजय माणिक सहाने(३८), ज्ञानेश्वरी विजय सहाने (२९), अनन्य विजय सहाने (९) असे तिघांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.