Lockdown in Aurangabad | औरंगाबादेत लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

औरंगाबादेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. (lockdown in aurangabad)

Lockdown in Aurangabad | औरंगाबादेत लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 7:58 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. औरंगाबाद शहर आणि इतर तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले असले तरी येथे कोरोनाला थोपवण्यात यश येत नाहीये. ही परिस्थिती पाहता येथील प्रशासनाने आता औरंगाबादेत लॉकडाऊन (lockdown in Aurangabad) लागू केला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Aurangabad administration announced lockdown in Aurangabad due to increase in Corona patient)

30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

मागील काही दिवासांपासू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. येथे बाजारपेठ, तसेच इतर सामान खरेद करण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त औरंगाबाद मनपा क्षेत्रात हजारो रुग्ण रोज आढळत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 1500 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद केली गेली. ही परिस्थिती गंभीर असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर आता येथील प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला असून येथे थेट लॉकडाऊन जाहीर केला आहे. येत्या 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अंशत: लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही

औरंगाबादेत येत्या 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी औरंगाबादमध्ये येत्या 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला  होता.  मात्र, तरीदेखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कोणतीही कमी झाली नाही.  त्यानंतर आता संपूर्ण लॉकडाऊनचा येथील प्रशासनाने निर्णय घेतला.

राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने नियम आणखी कडक केले असून नागरिकांनी नियमांच्या अधीन राहूनच सर्व कामे करावीत असे आवाहन केले आहे. नव्या गाईडलाईन्स नुसार राज्यात  आजपासून रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगीन अगेनचे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री बंद, हॉटेलची पार्सल व्यवस्था सुरु, राज्यात काय सुरु काय बंद, नव्या नियमावलीत निर्बंध काय?

तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको; राज्यातील जमावबंदीला भाजपचा विरोध

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

(Aurangabad administration announced lockdown in Aurangabad due to increase in Corona patient)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.