AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

जालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 08, 2020 | 9:33 AM
Share

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली. (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

मालवाहू रेल्वेच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रेल्वे रुळापासून काही अंतरावर असलेले चार मजूर थोडक्यात बचावले. या मजुरांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचं समुपदेशन करुन त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

जालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते भुसावळच्या दिशेने पायी निघाले होते, मात्र रात्री थकून त्यांनी रेल्वे रुळावरच झोप घेतली. सर्वांची नावे, पत्ते यांची पडताळणी करुन यादी केली जात आहे, असंही मोक्षदा पाटील यांनी सांगितलं.

पहाटे 5.15 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने धडक दिलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.

पहाटे काही कामगारांना रुळावर पाहून मालगाडीच्या लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परभणी-मनमाड विभागातील बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान धडक बसली. जखमींना औरंगाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. (Aurangabad Labors Killed in Train Mishap)

हेही वाचा : औरंगाबादेतील मजुरांच्या मृत्यूने सुन्न! स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.

भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.

(Aurangabad Labors Killed in Train Mishap)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री