AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला, औरंगाबादेत कॉन्स्टेबलने तक्रारदारालाच धुतलं

आरोपी आणि पोलिस कॉन्स्टेबलची हातमिळवणी असल्यामुळेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा पीडित तरुणाने केला आहे. (Aurangabad Man beaten up by Police )

डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला, औरंगाबादेत कॉन्स्टेबलने तक्रारदारालाच धुतलं
| Updated on: Mar 30, 2021 | 10:12 AM
Share

औरंगाबाद : पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाला पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलिस स्थानकात गेला असताना पोलीस कॉन्स्टेबलनेच त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. (Aurangabad Man allegedly beaten up by Police Constable for complaint against Goon)

औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे. सुनील मगर असं जखमी पीडित तरुणाचं नाव आहे. सुनील मगर डोकं फुटलेल्या अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

जखमी तरुण सुनील मगर आणि सोनू घुरी या आरोपीमध्ये वाद झाला होता. मारामारीत सुनील मगरचं डोकं फुटलं. त्यानंतर सुनील तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी सुनीलचं काहीही ऐकून घेण्यास नकार दिला.

तरुणाच्या कुटुंबीयांनाही मारहाण

आरोपी आणि पोलिस कॉन्स्टेबलची हातमिळवणी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा पीडित तरुणाने केला आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबालाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे.

पोलिसाने सुनीलला केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्यावर कारवाई होणार का, हा सवाल विचारला जात आहे. (Aurangabad Man allegedly beaten up by Police Constable for complaint against Goon)

पाहा व्हिडीओ :

जेवण न दिल्यामुळे तरुणांची हॉटेलमध्ये तोडफोड

दुसरीकडे, जेवण दिलं नाही म्हणून तरुणांनी हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना औरंगाबादमध्येच उघडकीस आली आहे. औरंगाबाद शहरातील बीड बायपासवर मैथिली हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हॉटेलमधील टेबल खुर्च्यांसह कम्प्युटरचीही तरुणांनी तोडफोड केली. मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा हॉटेल व्यवस्थापनाचा दावा आहे. बाळापूर गावातील तरुणांनी तोडफोड केल्याची तक्रार हॉटेल चालकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

धक्कादायक! औरंगाबादेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

वर्ध्यात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला जबर मारहाण, माजी आमदारासह दोन पुत्रांवर गुन्हा

(Aurangabad Man allegedly beaten up by Police Constable for complaint against Goon)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.