औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा विस्फोट झालाय. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Aurangabad Mucormycosis Update 576 patient And 53 Death)

औरंगाबादेत 'म्युकरमायकोसिस'चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 9:11 AM

औरंगाबाद  : औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा ( Mucormycosis) विस्फोट झालाय. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचलीय. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे. (Aurangabad Mucormycosis Update 576 patient And 53 Death)

उपचारासाठी लागणारी इंजेक्शन अपुरी

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या पुन्हा चिंता वाढल्या आहेत. त्यात भरीस भर म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हेळसांड आणि मनस्तापाला सामोरे जावं लागतंय.

रुग्णसंख्या वाढण्याची भीती

औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे 399 रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली होती. परंतु एकाच दिवसात तब्बल 177 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 576 वर गेली. आता ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच म्युकरमायकोसिसचा विस्फोट पाहता आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. औरंगाबादला म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पडला आहे. जिल्हातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्ण आणि मृत्यूसंख्येची लपवाछपवी

अनेक रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसची खरी रुग्णसंख्या लपवली होती. मात्र आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे आणि मृत्यूंचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला मोठा धक्का बसलाय. म्युकरमायकोसिसचे आणखे बरेच रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.

आरोग्य यंत्रणेलाच माहिती नाही, काय चाललंय…?

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांची आरोग्य यंत्रणेलाच माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णांची माहिती आतापर्यंत समोर आलेली नव्हती. अखेर या संदर्भातील माहिती यंत्रणेला मिळाली आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र ही रुग्णालये नेमकी कोणती आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

(Aurangabad Mucormycosis Update 576 patient And 53 Death)

हे ही वाचा :

औरंगाबाद जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान

औरंगाबादमध्ये चाललेय काय ? दीड लाख रुपयांसाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रोखला, तीन दिवसांतील दुसरी घटना

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.