AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेला भगदाड? शिरसाटांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, गळती थांबवण्यासाठी आज निष्ठा मेळावा

जे स्वतःच्या मतदार संघात कधीही येत नाहीत. फिरत नाहीत. इकडे एक गाडीही त्यांनी कधी आणली नाही. पण मुंबईत मात्र त्यांनी एवढ्या बसेस नेऊन शक्तिप्रदर्शन केलं. त्यातीलही बहुतांश लोक शिवसैनिक नव्हते. हे सगळं मंत्रिपदासाठी सुरु असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

Aurangabad | औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेला भगदाड? शिरसाटांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, गळती थांबवण्यासाठी आज निष्ठा मेळावा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 9:47 AM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा वाढता पाठिंबा एक-एक करून औरंगाबादमधील (Aurangabad) महत्त्वाचे मतदारसंघ पोखरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी काल मुंबईत शेकडो शिवसैनिकांसह शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची स्थिती आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांनी मुंबईत भरवलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. शिवसेनेच्या इतिहासात मध्यरात्री झालेली ही पहिलीच सभा असल्याचा गावा करण्यात येत आहे. एकूणच संजय शिरसाट यांच्यामार्फत औरंगाबादमधील शिवसेनेतील असंख्य पदाधिकारी फुटल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी युवा सेनेचा निष्ठा मेळावा आयोजित केला आहे.

शिरसाटांसोबत कोण कोण?

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार शिदे गटात शामील झाले आहेत. त्यात आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याने त्यात वर्णी लागावी, यासाठी शिरसाट यांनी मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे पश्चिम मतदार संघातील बहुसंख्य पदाधिकारी मुंबईला गेले. यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सोनवणे, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख रमेश बहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आदीसह ग्रामीण भागातीलही शेकडो कार्यकर्ते होते.

टीव्ही सेंटर परिसरात निष्ठा मेळावा

औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जात होता. मात्र शिंदे गट फुटल्याने येथील शिवसेना खिळखिळी झाली आहे. पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्तेही बंडखोर आमदारांना शामिल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निष्ठा मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. युवा सेनेच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता टीव्ही सेंटर येथे निष्ठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी आदींची उपस्थिती असेल. सौभाग्य मंगल कार्यालयातील मेळाव्याला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा सेनेचे उपसचिव ऋषीकेळ खैरे आणि जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.

शिरसाट मंत्रिपदासाठी हपापलेले- दानवे

दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला आहे. हे सात-आठ वर्षांपासून मंत्रिपदासाठी हपापलेले आहेत. जे स्वतःच्या मतदार संघात कधीही येत नाहीत. फिरत नाहीत. इकडे एक गाडीही त्यांनी कधी आणली नाही. पण मुंबईत मात्र त्यांनी एवढ्या बसेस नेऊन शक्तिप्रदर्शन केलं. त्यातीलही बहुतांश लोक शिवसैनिक नव्हते. हे सगळं मंत्रिपदासाठी सुरु असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.