Nagar Panchayat: औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी 84% मतदान, 52 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

Nagar Panchayat: औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी 84% मतदान, 52 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
सोयगाव येथील मतदानासाठी महिलांची रांग

सतरा जागांसाठी झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची मोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल तीन टेबल साठी 35 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 19, 2022 | 9:02 AM

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांच्या निवडणुकीत मंगळवारी 1707 मतदारांपैकी 1445 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 84 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. दरम्यान काल सकाळी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याने ऐनवेळी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशावरून मतदारांमध्ये सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे मतदानासाठीही कोरोनाच्या संकटातही मतदारांनी मतदान केले आहे.

12 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

सोयगाव नगरपंचायतसाठी स्थगिती दिलेल्या चार प्रभागांसाठी मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली पहिल्या टप्प्यातील तेरा जागांसाठी चाळीस आणि दुसऱ्या टप्प्यासाठी चार प्रभागांसाठी बारा उमेदवार अशा 52 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.या निवडणुकीचा निकाल बुधवारी बचत भववान सभागृहात करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 35 निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती सोयगावचे स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिली आहे.

सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी

सतरा जागांसाठी झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची मोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल तीन टेबल साठी 35 कर्मचारी तैनात करण्यात आली असून मतमोजणीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे. 52 उमेदवारांचा बुधवारी फैसला होणार असून तीन टेबल साठी मतमोजणीची सहा फेऱ्यांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली असून दुपारी बारा वाजेपूर्वी निकाल बाहेर येणे अपेक्षित आहे.

इतर बातम्या-

अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळली होती ‘ही’ वस्तू! आता किंमतीचा अंदाजही लावू शकणार नाहीत

Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें