AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते; सभेची तयारी जोरात

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. यास विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. आता तर राज्यातीलच नाही तर अयोध्येतूनही कार्यकर्ते या सभेला येणार आहेत, असे समजते.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते; सभेची तयारी जोरात
राज ठाकरेंच्या सभेची तयारीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 3:30 PM
Share

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. सभेची तयारी पूर्णपणे आम्ही करणार आहोत. स्टेजचे काम दोन दिवसांत पूर्ण करणार, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी दिली आहे. तर मनसेच्या सभेला विरोध करणे हे काय ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. ही मनसेची सभा आहे. त्यास विरोध करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. भीम आर्मीच्या (Bhim Army) जिल्हाध्यक्ष सुमित खामकर यांनी सभेला विरोध दर्शवला होता. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, मात्र मनसेने सभा घेणारच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.

सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. भीम आर्मीने म्हटले आहे, की राज ठाकरे यांच्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोध आहे. या सभेमुळे, राज यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे. हिंदू-मुस्लीम दंगली होणार आहेत, असे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ती सभा आम्ही होऊ देणार नाही.

परवानगी मिळण्याची शक्यता

औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. शिवाय इतर मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. चिथावणीखोर वक्तव्ये केल्यास कारवाई होणार आहे.

आज होणार आहे बैठक

राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात आज मनसेची मोठी बैठक होणार आहे. औरंगाबाद शहरातील कलश मंगलकार्यलयात ही बैठक होणार आहे. बैठकीला मनसेचे किमान 400 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते. बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत सभेसंदर्भात नियोजन ठरवले जाणार आहे.

आणखी वाचा :

Pune Prashant Jagtap : महाविकास आघाडीचा एल्गार; पुण्यात घुमणार आवाज, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार सभा

Krupal Tumane on Navneet Rana: नवनीत राणांचे आरोप खोडून काढणारा पोलिसांचा व्हिडीओ कधी येणार?; शिवसेनेच्या खासदारांने सांगितली वेळ

Devendra Fadnavis Rally: औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.