Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?

मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत 52.2 मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटी पेक्षा  वेगाच्या पावसाने झोडपून काढले.

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?
औरंगाबादेत सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस मंगळवारीही दिवसभरही शहरात बरसत होता.

औरंगाबाद: गुलाब चक्रिवादळाचा धोका औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना बसेल, अशा इशारा हवामान विभागाकडून (Indian Meteorological department) देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्रीतून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. औरंगाबाद शहरातही हेच दृश्य दिसून आले.  (Cloudburst in Aurangabad)यामुळे शहरातील विविध ठिकाणी घरात पाणी घुसले. तसेच वीजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला. दरम्यान मंगळवारी दिवसभरही पावसाची संततधार सुरुच होती.

पहाटे तीन वाजता पावसाने घेतले रौद्ररुप

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळामुळाचा फटका शहरालाही बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा वेग 110.07 मीमी प्रति तास मोजला गेला. त्यानंतर मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. या तीस मिनीटाच्या काळात पाऊस पड़ण्याचा  सरासरी  वेग हा 108.8 मीमी प्रति तास एवढा नोंदला गेला.

किती झाला पाऊस?

मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत 52.2 मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटी पेक्षा  वेगाच्या पावसाने झोडपून काढले.   तर सोमवारी मध्यरात्रीतून सुरु झालेला पाऊस ते सकाळी 11.15 या वेळात झालेल्या पावसाची नोंद शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत 98.3 तर एमजीएम गांधेली वेधशाळेत 74.9 मीमी एवढी नोंद झाली, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

20 दिवसांपूर्वी अशीच औरंगाबादवर झाली होती ढगफुटी

20 दिवसांपूर्वी म्हणजेच 07 सप्टेंबर रोजी देखील औरंगाबाद शहरावर अशाच प्रकारे ढगफुटी झाली होती. 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पुढच्या दोन-तीन मिनिटात पावसानं रौद्र रुप धारण केलं. त्यानंतर आकाशात प्रचंड वीजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. तीस मिनिटात म्हणजे 7:40 मिनिटापर्यंत पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166:75 मिमी असा नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली होती. सामान्यपणे ढगफुटीदरम्यान ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

Aurangabad | नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने केली सुटका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI