Aurangabad Gold: सराफा बाजारात एकदा फेरफटका माराच, सोने-चांदी स्वस्त, नव-नवीन वस्तुंचीही आवक

नवरात्र उत्सवासाठी औरंगाबादच्या सराफा बाजारात चांदीच्या देवी-देवतांच्या प्रतिमा, चांदीचे मुकूट, चांदीचे देवघर आदी वस्तूंची आवक झाली आहे. सुमारे दीड वर्षांनंतर बाजारातली मरगळ दूर झाल्याचे चित्र आहे.

Aurangabad Gold: सराफा बाजारात एकदा फेरफटका माराच, सोने-चांदी स्वस्त, नव-नवीन वस्तुंचीही आवक
नवरात्रोत्सवासाठी औरंगाबादच्या सराफा बाजारात नव-नवीन वस्तुंची आवक झाली आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Oct 04, 2021 | 8:12 PM

औरंगाबाद: पितृपक्ष संपत आल्याने औरंगाबादच्या सराफा बाजारातील (Aurangabad sarafa market) मरगळही काहीशी झटकली जात आहे. नवरात्रोत्सवात घरोघरी दरवर्षी देवासाठी विशेष सोन्या-चांदीच्या (Gold And silver goods) वस्तूंची खरेदी केली जाते. सध्या बाजारात अशा विविध नव-नवीन वस्तूंची आवक झाली असून ती खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. दरम्यान सोने आणि चांदीच्या दरातही फार वाढ झालेली नसल्याने गुंतवणुकीसाठी (Investment in gold) हीच संधी असल्याचा सल्ला जाणकार देत आहेत.

शहरातील सोन्या-चांदीचे भाव

शहरातील सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46250 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 63300 रुपये एवढे नोंदले गेले. मागील आठवड्याच्या तुलनेत दरांमध्ये फार काही चढ-उतार दिसून आलेला नाही. त्यामुळे सोने अजूनही स्वस्तच असल्याने नवरात्रीच्या उत्सवात सोन्या-चांदीच्या वस्तूंची चांगली खरेदी होऊ शकते, असा अंदाज आहे. तसेच येत्या दोन ते तीन महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

चांदीचे देवघर आणि मुकूटांची विक्री

नवरात्र म्हटलं की देवीचा जागर. या काळात घरोघरच्या लहानश्या देवघरांचे रुप यावेळी पालटलेले दिसते. कुणी नवीन चांदीचं देवघर आणतं तर कुणी देवासाठी चांदीचे मुकूट तयार करून घेतं. तर कुणी देवाच्या सोन्या-चांदीच्या प्रतिमा तयार करून घेतात. यासाठी औरंगाबादच्या सराफा बाजारातही चांदीच्या वस्तूंची आवक झाली आहे. पितृपक्ष संपत आल्याने नागरिकही आता नवरात्राच्या तयारीसाठी घराबाहेर पडून खरेदी करत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर जास्त शुद्ध सोने आणि चांदी विकले जाते, अशी माहिती शहरातील त्रिमूर्ती चौकातील ज्वेलर्स दत्ता सराफ यांनी दिली.

सोन्याच्या दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी घसरून 1,753 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. यामुळे सोन्याच्या भावनेवर थोडासा परिणाम झाला आणि सोन्याचे भाव पडले.

इतर बातम्या-

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने घसरले, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा

Gold Price: सणासुदीपूर्वी सोनं स्वस्त होणार, खरेदीसाठी कोणती संधी योग्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें