AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | इथे शिंदेसेनाच तगडी, पैठणचे आमदार संदिपान भूमरेंनी y दर्जाची सुरक्षा नाकारली, CRPF ला पत्र

पैठणमध्ये परतताच आमदार संदिपान भूमरे यांनी सीआरपीएफला मेल केला. त्यांना पुरवण्यात आलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Aurangabad | इथे शिंदेसेनाच तगडी, पैठणचे आमदार संदिपान भूमरेंनी y दर्जाची सुरक्षा नाकारली, CRPF ला पत्र
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 06, 2022 | 9:54 AM
Share

औरंगाबादः एकनाथ शिंदे गटातील (ShivSena Eknath Shinde Group) पैठणचे आमदार संदिपान भूमरे (sandipan Bhumre) यांनी वाय दर्जाची सुरक्षा नाकारली आहे. शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर आमदारांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सर्वच आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. विशेषतः शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे (CRPF) जवान तैनात करण्यात आले होते. मात्र आमदार संदिपान भूमरेंनी ही सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. आमच्या भागात एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच तगडी असून कुणाचेही आम्हाला भय नाही, अशी भूमिका संदिपान भूमरेंनी मांडली. तसं पत्रही त्यांनी सीआरपीएफला पाठवलं. अशा प्रकारे केंद्र सरकारची सुरक्षा नाकारणारे संदिपान भूमरे हे राज्यातील पहिलेच आमदार आहेत.

बंडखोर आमदारांचं औरंगाबादेत आगमन

सोमवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री या नात्याने विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर मंगळवारी विविध आमदार आपापल्या घरी परतले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात औरंगाबादच्या पाच आमदारांचा समावेश आहे. यापैकी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि पैठणचे आमदार संदिपान भूमरे यांचं काल औरंगाबादेत आगमन झालं. वैजापूर आणि पैठण येथील शिवसेना समर्थकांनी काल त्यांच्या स्वागतासाठी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. तर 05 जुलै रोजी पहाटेच प्रदीप जैस्वाल हेदेखील औरंगाबादेत पोहोचले. आम्ही मंत्रीपद किंवा इतर कोणत्याही लालसेने एकनाथ शिंदेंसोबत गेलो नव्हतो तर आमच्या तत्त्वांची लढाई आहे, असं वक्तव्य औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केलं. आमदार संजय शिरसाट हे बुधवारी दुपारी औरंगाबादेत येतील. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची औरंगाबादमधील बंडखोरीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे मानले जात आहे. यासाठी त्यांना औरंगाबादचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भूमरेंचं सीआरपीएफला पत्र

पैठणमध्ये परतताच आमदार संदिपान भूमरे यांनी सीआरपीएफला मेल केला. त्यांना पुरवण्यात आलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरासाठी सर्वच शिवसेना आमदारांना केंद्र सरकारतर्फे ही सुरक्षा पुरवण्यात आली होती. याअंतर्गत आमदारांच्या सुरक्षेसाठी 6 बंदुकधारी जवान तैनात करण्यात आले होते. मात्र या सुरक्षा कवचाची मला गरज नाही, असं वक्तव्य भूमरेंनी केलं. सीआरपीएफला एक मेल लिहून भूमरेंनी त्यांची भूमिका मांडली. अशा प्रकारे केंद्र सरकारची सुरक्षा नाकारणारे संदिपान भूमरे हे राज्यातील पहिलेच आमदार आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच