Aurangabad | Chandrakant Khaire हे वैफल्यग्रस्त नेते, त्यांच्यावर चपला उचलण्याची वेळ, मनसेच्या दिलीप धोत्रेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 22, 2022 | 12:29 PM

औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा टोला मारणाऱ्या चंद्रकांत खैरेंना मनसेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे वैफल्य ग्रस्त नेते असून त्यांना त्यांच्याच पक्षात आता जागा नाहीये. त्यांचं हे वक्तव्य वैफल्यातून आलं आहे. या राज्यात राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या […]

Aurangabad | Chandrakant Khaire हे वैफल्यग्रस्त नेते, त्यांच्यावर चपला उचलण्याची वेळ, मनसेच्या दिलीप धोत्रेंचं प्रत्युत्तर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा टोला मारणाऱ्या चंद्रकांत खैरेंना मनसेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे वैफल्य ग्रस्त नेते असून त्यांना त्यांच्याच पक्षात आता जागा नाहीये. त्यांचं हे वक्तव्य वैफल्यातून आलं आहे. या राज्यात राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी स्वयंस्फूर्ततेने येते, असं वक्तव्य मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली. राज ठाकरे यांची सभा येत्या 01 मे रोजी औरंगाबादमध्ये होत आहे. त्यानिमित्त शिवसेना आणि मनसेमध्ये आतापासूनच शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे.

चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य काय?

शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज राज ठाकरे यांच्या सभेबद्दल भाकित वर्तवलं. राज ठाकरे यांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मेळाव्यात 300 रुपये देऊन लोक आणले होते. आता तर या भव्य सभेलाही पैसे देऊनच लोक आणले जातील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच हवं तर माध्यमांनी जमलेल्या गर्दीतील लोकांना विचारून याची पडताळणी करावी, असा दावाही खैरे यांनी केला आहे.

दिलीप धोत्रेंचं प्रत्युत्तर काय?

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्याला उत्तर देताना दिलीप धोत्रे यांनी सडेतोड टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ वैफल्यग्रस्ततेतून हे वक्तव्य आलं आहे. खैरे साहेब, तुम्हाला माहिती आहे. या देशात, या राज्यात असा एकमेव नेता राज ठाकरे आहेत. ज्यांच्या सभेला लोकांची गर्दी खेचून आणावी लागत नाही. लोक स्वयंस्फूर्ततेने येतात. तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. राज ठाकरे हे राज्यात एकमेव नेते आहेत, ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी पैसे न देता येते. तुम्हाला तुमच्या पक्षात तुमची जागा कुठे आहे, माहिती नाही. तुमच्या मुलाएवढं, नातवाएवढं वय असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या चपला उचलायची पाळी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तरी किमान अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. पहिल्यांदा तुमच्या पक्षातलं स्थान निश्चित करा. ते डळमळीत झालं आहे. असले आरोप करणं बंद करा, हे तुम्हाला शोभणारं नाही, असं दिलीप धोत्रे म्हणाले.

इतर बातम्या-

Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है

समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच