Aurangabad | वाइन विक्री केल्यास दुकाने फोडू, राज्य सरकारच्या जाहिरातीवरून खा. इम्तियाज जलील यांचा पुन्हा इशारा

माझे मत सोपे आहे: तुम्ही वाइन विक्री करा, आम्ही दुकान तोडतो. महराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील महिलांनी उघडपणे समोर यावे, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

Aurangabad | वाइन विक्री केल्यास दुकाने फोडू, राज्य सरकारच्या जाहिरातीवरून खा. इम्तियाज जलील यांचा पुन्हा इशारा
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:40 AM

औरंगाबाद | किराणा दुकाने, सुपरमार्केट आणि मॉलमध्ये वाइन विक्रीसंदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra State) नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तुम्ही दुकानांमध्ये वाइनची विक्री (Wine Selling) करा, आम्ही दुकान फोडतो, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णायाविरोधात महिलांनी उघडपणे समोर यावे, असे आवाहनदेखील खासदार जलील यांनी केले आहे. यापूर्वीदेखील राज्य सरकारने वाइन विक्रीसंदर्भातील धोरणाची घोषणा केली होती तेव्हा खासदार जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. कुणाची हिंमत असेल तर औरंगाबादच्या दुकानांमध्ये वाइन विक्री करून दाखवा. ज्या दुकानात पहिल्यांदा वाइन येईल, ते दुकान आम्ही फोडणार, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर सदर धोरणासंदर्भाने राज्य सरकारने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यावरही खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे राज्य सराकरला वाइन विक्री धोरणाची अंमलबजावणी करताना औरंगाबादमध्ये तीव्र प्रतिक्रियेला सामोरे जावे लागणार, असे दिसतेय.

राज्य सरकारची जाहिरात काय?

किराणा दुकानात वाइन विक्रीबद्दल नागरिकांचे मत देण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे- सर्व नागरिकांना कळवण्यात येते की, सुपर मार्केटमध्ये मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीत वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतच्या अधिसूचनेचा मसूदा दिनांक 31 मार्च 2022 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर मसुद्यावर राज्यातील नागरिकांकडून हरकती किंवा सूचना मागवण्यात येत आहेत. सदर हरकती किंवा सूचना दिनांक 29 जून 2022 अखेरपर्यंत किंवा त्यापुर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीर भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई- 4000023 यांच्याकडे टपालाद्वारे किंवा dycomm-inspection@mah.gov.in या ईमेलवर नोंदवण्यात याव्यात. अधिसूचनेचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ http://stateexcise.maharashtra.gov.in येथे तसेच आयुक्त कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात आले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया काय?

राज्य सरकारने जारी केलेल्या जाहिरातीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ट्वीटरवरून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. ही अधिसूचना लोकांना वाइन विक्रीच्या नव्या धोरणाबद्दल मत देण्यास सांगते. माझे मत सोपे आहे: तुम्ही वाइन विक्री करा, आम्ही दुकान तोडतो. महराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील महिलांनी उघडपणे समोर यावे, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

इतर बातम्या-

Qutub Minar: गणेशमूर्तींचा वाद चिघळला, तरुण विजयनंतर भाजप नगरसेवकानी ही केली मागणी

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवा

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.