Aurangabad: तलाठी लक्ष्मण बोराटे आत्महत्याप्रकरणी 8 जणांना नोटीसा, तलाठ्याविरोधातही महिला कर्मचाऱ्याची तक्रार?
औरंगबााद येथील तलाठी लक्ष्मण बोराटे यांनी दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांच्या दबावामुळे हे कृत्य करत असल्याचे लिहिले होते. त्या दिशेने पोलीस तपास सुरु होता. मात्र आता बोराटे यांच्याविरोधातही महिला कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहितीही उघड झाली आहे.

औरंगाबादः जिल्ह्यातील अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी लक्ष्मण बोराटे यांनी रविवारी आत्महत्या (Aurangabad suicide) केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तसेच या चिठ्ठीत जवळपास 13 जणांची नावे असून त्यात वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांचाही समावेश आहे. बोराटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
सातारा पोलिसांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात
सातारा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून आतापर्यंत पोलिसांनी या चिठ्ठीतील नावे उघड करण्यास मनाई केली होती. बुधवारी बोराटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांची सातारा पोलीसांकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत मंगळवारी 8 जणांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
बोराटे यांच्याविरोधातही ‘विशाखा’ समितीकडे तक्रारी
दरम्यान, बोराटे यांच्याविरोधातदेखील एका महिला कर्मचाऱ्याने तहसीलदार, विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. सिटी चौक पोलिसांनी त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदार तायडे यांच्याकडून माहितीदेखील मागवल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. या तक्रारींनुसारदेखील पोलिसांचा तपास आणखी वेगळे वळण घेऊ शकतो.
इतर बातम्या-
