Aurangabad | डोळ्यात मिरची पावडर टाकून अडवलं, 90 हजारांची रक्कम पळवली, औरंगाबादेत भर दुपारी लूट

दुपारी अडीच वाजता पेट्रोल पंपावरून बदनापूरकडे ते निघाले असता दुपारी अडीच ते 2.40 वाजेदरम्यान, बदनापूर महानुभाव आश्रमजवळ पोहोचले. पाठीमागून एका मोटार सायकलवर अज्ञात दोन जण आले व त्यांनी पाटील यांची मोटार सायकल आडवी करून डोळ्यात मिरची पावडर फेकली.

Aurangabad | डोळ्यात मिरची पावडर टाकून अडवलं, 90 हजारांची रक्कम पळवली, औरंगाबादेत भर दुपारी लूट
चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 2:51 PM

औरंगाबादः औरंगाबाद जालना (Aurangabad- Jalna) महामार्गावर भर दुपारी चोरीची (Big theft) घटना घडली. रस्त्यावरून 90 हजार रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या मोटरसायकलसमोर चोरांनी (Thieves) आपली मोटरसायकल आडवी लावली. क्षणार्धात संबंधित व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली आणि त्याच्या गाडीवरील 90 हजार रुपयांची रोकड पळवली. यासोबत काही आरटीजीएसचे चेकही चोरट्यांनी पळवले. सोमवारी भर दुपारी बदनापूर महानुभाव आश्रमाजवळ घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली. दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबादेत दिवसेंदिवस चोरीच्या आणि हाणामारीच्या घटना वाढत असल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

काय घडली घटना?

औरंगाबाद-जालना महामार्गावरील बदनापूर प्राइम पेट्रोलपंपाची रक्कम बँकेत भरण्यासाठी पाथ्रीकर शाळेचे कर्मचारी रवींद्र पाटील हे 09 मे रोजी दुपारी निघाले होते. दुपारी अडीच वाजता पेट्रोल पंपावरून बदनापूरकडे ते निघाले असता दुपारी अडीच ते 2.40 वाजेदरम्यान, बदनापूर महानुभाव आश्रमजवळ पोहोचले. पाठीमागून एक मोटार सायकलवर अज्ञात दोन जण आले व त्यांनी पाटील यांची मोटार सायकल आडवी करून डोळ्यात मिरची पावडर फेकली. तेवढ्यात आणखी एका मोटर सायकलवर दोघे जण आले व त्यांनी हातातील दांड्याने पाटील यांच्या दंडावर व पाठीत मारहाण करून खाली पाडले. त्यांच्या गळ्यात असलेली बॅग घेऊन पुन्हा आले त्याच मार्गाने पळाले. बॅगमध्ये 90 हजार व आरटीजीएससाठी असलेला धनादेश व इतर कागदपत्रे होती.

रात्री उशीरा तक्रार दाखल

सदर घटनेनंतर रवींद्र पाटील यांनी प्राईम पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची आपबीती सांगितली. बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून रात्री उशीरा यासंबंधीची फिर्याद दाखल झाली.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.