Crime: औरंगाबादेत हत्येची मालिका सुरूच, मुकुंदवाडीत दोन दिवसात दोन महिलांची हत्या

शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक तरुणी आणि एका विवाहित महिलेचा खून झाला. यातील तरुणीच्या हत्येचा संशय तिच्या मित्रावर आहे तर विवाहितेच्या हत्या तिच्या पतीनेच केल्याचे उघड झाले आहे.

Crime: औरंगाबादेत हत्येची मालिका सुरूच, मुकुंदवाडीत दोन दिवसात दोन महिलांची हत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 4:33 PM

औरंगाबादः शहरातील खूनाची (Murder in Aurangabad) मालिका संपता संपत नसल्याचं चित्र आहे. मुकुंदवाडी (Mukundwadi ) परिसरात दोन दिवसांत दोन महिलांचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याता 22 वर्षीय युवती आणि 39 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. यातील युवती सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती, मात्र नंतर घरी परतलीच नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगर भागातील मोकळ्या मैदानात तिचा मृतदेह आढळला. यातील 22 वर्षीय मृत मुलीचे नाव इंदुमती बारकुराय असे आहे. तर सुनिता पोपट चिनगारे असे विवाहित महिलेचे नाव आहे .

मोकळ्या मैदानावर आढळला तरुणीचा मृतदेह

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली इंदुमती एका मोबाइल कंपनीच्या दालनात आठ दिवसांपूर्वीच कामाला लागली होती. मुकुंदनगरमध्ये वडील आणि दोन भावांसोबत ती राहत असे. तिचे वडील आणि भाऊ मजुरी करतात. सोमवारी इंदुमती सकाळी कामावर गेली होती. मात्र संध्याकाळी सहा वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या मैत्रीणी, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगरपासून बायपासच्या दिशेने असलेल्या मोकळ्या मैदानावर दूध विक्रीसाठी जाणाऱ्या काही महिलांना तिचा मृतदेह दिसून आला. तिचा हात आणि गळ्यावर व्रण दिसत होते. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी सकाळी तिचे वडील व भाऊ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु तिचा मृतदेहच सापडल्याने त्यांना खूप धक्का बसला. याप्रकरणी भावाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत तरुणीचा मित्रही बेपत्ता, संशयास्पद

इंदुमतीचे कुटुंब परराज्यातील असून काही वर्षांपूर्वी ते औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारकुराय यांच्या गावाकडील एका मुलाशी तिची मैत्री होती. इंदुमतीचा मृतदेह आढळल्यापासून तो युवकदेखील बेपत्ता आहे. खूनाचा संशय त्याच्यावर असून पोलीस युवकाच्या शोधात पुण्याच्या दिशेने गेले होते. मारेकऱ्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मृतदेहापासून काही अंतरावर तिचे कानातले पडले होते. तिचा गळा आवळल्याचे व्रण होते व हातावरही मारहाणीच्या खुणा होत्या.

मृत विवाहितेचा खून पतीनेच केला

दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून सुनिता शिनगारे यांच्या पतीनेच झोपेत गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत सोमवारी डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल दिल्यानंतर या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत पती पोपट रामराव शिनगारे हा पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबूली दिली. मूळ अंजनडोह येथील रहिवासी असलेला हा पती मजुरी करत होता. तो नेहमीच पत्नीला मारहाण करत असे, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबादेत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला, मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी

औरंगाबादेत लस नसेल तर रेशन, पेट्रोल, पर्यटन, प्रवास गॅस सबकुछ बंद! सक्तीच्या सूचना, वाचा कुठे कुठे प्रमाणपत्र अनिवार्य?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.